Friday, December 10, 2010

सिंधुदुर्गातील शेतकरी आता ऑनलाईन / Mahakrushi helps farmer to use modern technology.


राज्यातील शेतीसाठी हवामानाचा सल्ला, खते, बी-बियाणे उपलब्धता, बियाणांची गुणवत्ता, शेतीविषयक समस्या, कृषी विभागाच्या विविध योजना इत्यादी अनेक बाबींची माहिती शेतकर्‍यांना भ्रमणध्वनीद्वारे उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने महा कृषीसंचार योजना सुरु केली आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात भारत संचारच्या नेटवर्कमधून राज्यातील दोन लाख शेतकर्‍यांशी विविध पिकांबाबत संवाद साधला. हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील घडामोडींचा अंदाज, तज्ज्ञ शेतकर्‍यांचे अनुभव व कृषी अधिकार्‍यांचे मार्गदर्शन होण्यास या योजनेचा उपयोग झाला.

महा कृषीसंचार योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांकडून बीएसएनएल दरमहा ९९ रुपये एवढे भाडे आकारणार आहे. या बदल्यात क्लोज युजर ग्रुपसाठी सर्व कॉल मोफत राहणार आहेत. तसेच क्लोज युजर ग्रुप व्यतिरिक्त अन्य नेटवर्क चे कॉल ४०० मिनिटे व बीएसएनएलचे कॉल १०० मिनिटे मोफत असतील. त्याशिवाय ४०० एसएमएस आणि एक जीबी डाऊनलोड मोफत मिळणार आहे. बीएसएनएलचे मोबाईलधारक आहे त्याच क्रमांकानिशी महा कृषीसंचार योजनेत सहभागी होऊ शकतील. या योजनेंतर्गत मराठी व इंग्रजीत एसएमएस पाठविता येतात.

या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकर्‍यांनी स्वत:चे नाव, क्षेत्र नावावर असलेला जमीन उतारा, सातबारा, एक फोटो तसेच निवासाचा पत्ता नोंदविणे आवश्यक आहे. लँडलाईन दूरध्वनीच्या नजीकच्या भरलेल्या बिलाची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. यापूर्वीचा बीएसएनएल दूरध्वनी नसल्यास एका कागदावर शेतकर्‍याने फोटो लावून सदर शेतकरी त्या गावात राहत असल्याबाबतचा सरपंचांच्या सहीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

महा कृषीसंचार योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांनी तसेच कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी या सेवेसाठी दरमहा ९९ रुपये भाडे स्वत: भरावयाचे आहे. अशा या योजनेचे फलित म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही गावांत सामुहिक कृषी विचारमंचच्या माध्यमातून एकत्रित फी देखील भरली जात आहे. ऑनलाईन शेतकरी आता बाजारपेठेतील भावाप्रमाणे अन्य बाबींसाठीही या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहे. महा कृषी संचारमुळे शेतकर्‍याला अपटूडेट माहिती मिळाल्याने त्या माहितीच्या आधारे अधिकाधिक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होताना दिसतील. सिंधुदुर्ग सारख्या निसर्गरम्य जिल्ह्यात या सेवेमुळे शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हे विशेष होय.

डॉ. गणेश मुळे 

'महान्यूज'मधील मजकूर

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद