Saturday, December 4, 2010

गावचे दूध 'डोअर टू डोअर' Traditional but new milk marketing tricks by Indian farmer.


दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गणला जातो. अमरावती शहरापासून २० ते २५ किलोमिटर अंतरावरील अनेक शेतकर्‍यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरु केला आहे. शहराच्या परिघात ४० खेडी आहेत. त्या खेडय़ांमधून शहराला दररोज अंदाजे १८ हजार लिटर दुधाचा पूरवठा होतो. जवळपास ३०० दूध उत्पादक रोजच शहरातील प्रत्येक कॉलनीतील घरोघरी उकडय़ाचे दूध विकण्याचा व्यवसाय करतात. या व्यवसायामुळे शेतीवर असलेले अवलंबित्व कमी होऊन शेतकरी आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल करीत आहे. याच व्यवसायातून ते गेली अनेक वर्षे आपला चरितार्थ चालवित आहेत. 

दूध हे दररोजच्या गरजेचा अत्यंत आवश्यक घटक आहे. शहरात दुधाची मागणी वाढत असून मागणीनुसार पुरवठा कमी आहे. त्यामुळे अनेक वेळा दुधाची टंचाईसुध्दा भासते. परंतु शेतकर्‍यांनी दुधाचा व्यवसाय सुरु केल्यामुळे अमरावती शहरात मात्र दुधाची फारशी टंचाई नाही. 

अमरावती शहराजवळ असलेल्या मार्डी, दिवाणखेडा, भानखेडा पोहरा, नांदगाव पेठ, वडगाव, बोरगाव, माहुली, सालोरा, पिंपळखुटा, परसोडा, इंदला, मासोद, राजुरा, रहाटगाव, कठोरा, नांदुरा, खानापूर, थुगाव, टेंभा, सुकळी, वनारसी, कुंड, हातुर्णा, सावरखेड, अळणगाव, खारतळेगाव, वलगाव, लोणटेक, मलकापूर, पांढरी, भातकुली, रेवसा, नवसारी, लोणी, टाकळी, जनुना, अकोली, चांदुरी व बडनेरा यासह ४० गावांतील शेतकर्‍यांनी शेतीमधील उत्पादनातून वार्षिक खर्च भागविणे शक्य नसल्यामुळे शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय सुरु केला आहे. प्रत्येक शेतकर्‍याने गाई व म्हशीची खरेदी करून अमरावती शहराला लागणारे दुध पुरविण्याचा निश्चय केला आणि त्यानुसार दुधाचे उत्पादन सुरु केले आहे. 

प्रत्येक गावातून २०० ते ६०० लीटर दूध शहरात विक्रीकरिता आणले जाते. आज सहकारी तत्त्वावर दूध गोळा करण्याचा त्यांचा संकल्प आहे. दूध उत्पादक संस्था व जिल्हा संघही अस्तित्वात आहे. त्याच्यासोबत शेतकर्‍यांनी नव्याने सुरु केलेल्या व्यवसायाला मार्गदर्शन मिळविण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. 

वसंतराव नाईक शेती स्वावंलबन मिशनमुळे शेतकर्‍यांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले. मिशन अंतर्गत मिळालेली दुधाळ जनावरे व शेतकर्‍यांनी खरेदी केलेली दुधाळ जनावरे यांच्या सहकार्याने शेतीला पूरक जोडधंदा म्हणून हा व्यवसाय फायद्याचा ठरताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळले आहे.

अमरावती शहरातील शासकीय व खाजगी दूध डेअरिंना हे उत्पादक ठोक दरात दुधाची विक्री करतात. तसेच शहराच्या विविध भागात दुधापासून लोणी, तूप, दही, चक्का, पनीर, खवा, श्रीखंड व आम्रखंड तयार करण्यासाठी दुधाचा पुरवठा करतात. शहराच्या सभोवताली असलेल्या गावांना दूध उत्पादनाचा चांगला व्यवसाय उपलब्ध झाला आहे.

'महान्यूज'मधील मजकूर

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद