Wednesday, February 28, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 28/02/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१८.*

वरील सॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे पश्चिम दिशेकडून म्हणजेच कर्कवृत्तावरील रेषेवर ढगांचा  खूप मोठा समूह पश्चिमेतील ओमान/मस्कत भागाकडून पाकिस्तानातील कराची/ गुजरातचा कच्छ, पक्ष्चिम मध्यप्रदेश, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याकडे आगेकूच करत   आहे.

आज संध्याकाळपर्यंत हा ढगांचा समूह संपूर्ण गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश,उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आपली व्याप्ती वाढवेल व येथील संपूर्ण वातावरण कमी जास्त प्रमाणात ढगाळ होईल.

संध्याकाळी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,नंदुरबार, धुळे,जळगाव या जिल्ह्यांतील काही तालुक्यात हलक्याफुलक्या पावसाची शक्यता आहे.

ही शक्यता असली तरी ती खूपच कमी असलेने घाबरून जाण्याचे कारण नाही.

पण  ढगांची आगेकूच अशीच राहिली तर उत्तर महाराष्ट्रात व विदर्भापर्यंत मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील जिल्ह्यात वातावरण उद्यापर्यंत ढगाळ व हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल.
क्वचित काही ठिकाणी ढगांची उंची जास्त राहिली तर मग गारपीठीची ही शक्यता नाकारता येत नाही.
पण ही शक्यता खुप कमी आहेत.

सुधारित हवामानाचा अंदाज व सखोल मार्गदर्शन आज संध्याकाळी सहा वाजता दिले जाईल.
आज याची खूप गरज वाटतेय.


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Monday, February 26, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 26/02/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक २६ फेब्रुवारी २०१८.*

सॅटेलाईट इमेज क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे अफगाणिस्तान/पाकिस्तान या भागातील भयानक वादळ आपले आणखीच भयानक रूप धारण करीत असून त्याने लंब गोलाकार नागाच्या फण्यासारखा आकार धारण केला आहे.

या भयानक वादळ सदृश्य परिस्थितीमध्ये खूप दाट असे अवकाळी पाऊस व गारपिटीहीे करण्याजोगे ढग आहेत त्यामुळे हे वादळ सरकत राजस्थान/गुजरात या भागावर आले  तर मग उत्तर महाराष्ट्राची दयनीय अवस्था होऊ शकते.

त्या दिशेने या वादळाची थोडीफार पावले पडत असून आम्ही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत...!

आज मध्य महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यावर काहीसे जास्त प्रमाणात बाष्प आले आहे त्यामुळे पहाटे बऱ्याच ठिकाणी हलकेसे धुके पडले असेल....
त्यात हे बाष्प वायव्य/ उत्तरेकडून आले असल्याने यात गारवा आहे त्यामुळेच सकाळी किंचित थंडी जास्त जाणवली असेल.

आम्हाला चिंता याच गोष्टींची असून पुढील परिस्थितीचा अंदाज घेणे अवघड जात आहे.
कारण वाऱ्याची दिशा व हवेचा दबाव वायव्य/ उत्तरेकडून महाराष्ट्राकडे दिसत असल्यामुळे हे भयानक वादळ महाराष्ट्रावर येऊन नुकसान करते की काय ही चिंता सतावत आहे.

असो,

पुढील परिस्थितीवर आम्ही बारीक नजर ठेऊन आहोत.. गरज असल्यास रात्री परत एकदा माहिती व सखोल मार्गदर्शन केले जाईल....!

आज उकाडा जास्त जाणवेल पण त्याबरोबरच वाऱ्याचा वेग महाराष्ट्रातील बऱ्याच भागात थोडाफार जास्त असल्याने तो सहन करता येईल...
आज वातावरण कोरडे नसून थोडेफार बाष्प महाराष्ट्रावर आहे त्यामुळे काही भागात दमटपणा जाणवेल.

काही भागात वातावरण किंचित म्हणजे किंचित ढगाळ होण्याची शक्‍यता आहे याचे कारण वातावरणातील बाष्प हे आहे......!


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Sunday, February 25, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 25/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*

*आज दिनांक २५ फेब्रुवारी २०१८.*

सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे पश्चिमेकडील पाकिस्तान/अफगाणिस्तान या देशावरील जी भयानक  वादळ सदृश्य परिस्थिती आहे...ती पुढील काळासाठी महाराष्ट्रासाठी किंबहुना भारतासाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत....!

या वादळाचे भारताकडे म्हणजेच राजस्थान/गुजरात या भागाकडे आगेकुच दिसत आहे, त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात याची वाटचाल ही चिंतेची बाब ठरणार आहे......

उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वातावरणात बाष्प आल्यामुळे उद्या पहाटे किंचित ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे....

आम्ही येणाऱ्या परिस्थितीवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून आहोत पुढील काळात जसे गरजेचे वाटेल तसे पुढील अंदाज व सखोल मार्गदर्शन केले जाईल......!


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Saturday, February 24, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 24/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*

*आज दिनांक २४ फेब्रुवारी २०१८.*

सॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे जम्मू-कश्मीर, काबूल वरती चीनपर्यंत एक चक्रीवादळ आपले भयानक रुप धारण करीत आहे.

हे समुद्रातील चक्रीवादळ नसल्याने याचे स्वरूप थोडेफार वेगळे आहे या वादळात थंडगार ढग असल्याने याचा परिणाम येथील भागात विपरीतपणे होऊ शकतो.

पण या चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्राचा बराचसा फायदा झाला आहे. कारण
महाराष्ट्रातील बऱ्याच भागात संभावित गारपीट व अवकाळी पाऊस पडण्याची जी शक्यता होती ती टळली आहे....

पुढील आठवड्यात  वातावरण बऱ्यापैकी स्वच्छ व निरभ्र असेल कारण नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्रावरील बाष्प महाराष्ट्रावर येत असून ते हळूहळू थंडी कमी करून उकाडा वाढवतील.

महाराष्ट्रात पहाटे काही ठिकाणी किंचित धुके पडण्याची शक्यता आहे.
पहाटे थोडीफार थंडी/धुके व दिवसभर कोरडे वातावरण/उकाडा जाणवेल.
संध्याकाळी छानसा वारा सुटेल.

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Friday, February 23, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 23/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*
खालील सॅटेलाइट फोटो क्रमांक-1 मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्राचा गोवा राज्याकडील दक्षिण भाग वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प हे उत्तरेकडून वाहणार्‍या वार्‍यामुळे सरकत खाली आले असून आज पहाटे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे धुके पडले असेल.

सॅटेलाइट क्रमांक-2 मध्ये दिसत असल्याप्रमाणे
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा मध्य भाग,
नंदुरबारचा बहुतांशी भाग, धुळ्याच्या उत्तरेकडील भाग, जळगावचा बहुतांशी भाग किंचित ढगाळ वातावरण निर्माण होईल.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्हाचा बहुतांशी भाग,
साताऱ्याचा सह्याद्री पर्वतरांगाकडील पश्चिम भाग, कोल्हापूरचा बहुतांश भाग,
सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग, सोलापूर जिल्ह्याचा मध्य भाग, काही अंशी ढगाळ वातावरण राहील.

मराठवाड्यामध्ये अहमदनगरचा निम्मा उत्तर भाग,
औरंगाबादचा काही दक्षिण भाग,
जालना जिल्हा बहुतांश भाग, परभणी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील व बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडील काही भाग,
उस्मानाबाद जिल्हा बहुतांश भाग, लातूर जिल्ह्यात मध्य भाग,
नांदेड जिल्ह्याचा यवतमाळकडील पुर्व-उत्तरेच्या भागात वातावरण ढगाळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमरावती विभागातील अमरावतीचा उत्तर भाग,
बुलढाणा,वाशिम,अकोला,हिंगोली जिल्ह्यातील काही भाग तसेच यवतमाळ जिल्ह्याचा नांदेड हिंगोली कडील पश्चिम-दक्षिण भाग ढगाळ राहील.

विदर्भात वर्धा जिल्ह्याचा काही भाग,
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा बहुतांशी भाग,
चंद्रपूरचा बऱ्यापैकी सर्व भाग, गडचिरोली जिल्ह्यातील पूर्ण भाग, वातावरण ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे.

सॅटेलाइट फोटो क्रमांक-३मध्ये दिसत असल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्याचा व यवतमाळ जिल्ह्याचा एकमेकांत सामावलेल्या भागावरती खूप जास्त प्रमाणात ढगांची दाटी आहे त्यामुळे तेथील वातावरण खूप ढगाळ राहील....

तसेच परभणी जिल्हा जालना जिल्ह्याच्या सीमेवरील परभणी चा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल....

उस्मानाबाद जिल्ह्याचा मध्य दक्षिण भाग व लातूर जिल्ह्याचा निम्मा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल....

आपण ज्या गारपिटीची व अवकाळी पावसाची धास्ती घेऊन बसला आहात त्याची चाहूल राजस्थान व गुजरात/कच्छ येथे लागली असून तो महाराष्ट्रात आज येईल असे वाटत नाही कारण त्याचा वेग कमी असून तो जैसलमेर,जोधपुर,भुज,कराची या भागामध्ये बऱ्यापैकी स्थिरावला आहेे.
तो महाराष्ट्राच्या उत्तर भागात,मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात, गुजरातच्या दक्षिण भागात प्रवेश करील असे संकेत आहेत....

पण आमचा अभ्यास असा सांगतो की आज तरी महाराष्ट्रातील कोणत्याच भागामध्ये पाऊस व गारपिटीची शक्यता नाही.....तरी झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे,नाशिक मधील उत्तर भागात किंचित पाऊस होऊ शकतो.

घाबरून जाण्यासारखी खूप बिकट परिस्थिती नाहीये तरी धैर्याने येणाऱ्या संकटाला सामोरे जावे.

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Thursday, February 22, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 22/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*

*आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१८.*

सॅटेलाइट फोटो क्रमांक -१ मध्ये दिसत असल्याप्रमाणे उत्तरेकडून हवेचा दाब हा वाढला असून किंचित प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रावर साधारण थंडी आज जाणवत असेल.

कोल्हापूर सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण महाराष्ट्रभर पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प उत्तरेकडून सरकत आले असून आज बहुतेक महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पहाटे थोडेफार धुकेे दिसून आले असेल.

ही येणाऱ्या काळातील धोक्याची घंटा असून पुढील काळात काबुल,मुलतान, श्रीनगर या भागातील म्हणजेच पाकिस्तान भागात असलेले थंडगार ढग खाली सरकत पंजाब,राजस्थान, गुजरात/मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रावर येऊ शकतात.

दुसरी एक शक्यताही असू शकते जी म्हणजे येणाऱ्या काळात म्हणजेच एक-दोन दिवसात बहरीन,कतार व मस्कत या भागावरील जे दाट ढग आहेत तेसुद्धा कराची, भुज या  मार्गे महाराष्ट्रात येऊ शकतात.

सरकार व प्रशासनाने दिलेल्या धोक्याच्या सूचनेनुसार वरील दोन शक्यता असून या शक्यतेमुळेच अवकाळी पाऊस व गारपीट होऊ शकते.

तिसरी ही एक शक्यता आहे ती म्हणजे सोमालिया देशाजवळ व लक्षद्वीप मालदीवच्या खाली जे वादळ सदृश्य ढग आहेत ते जर नैर्ऋत्य दिशेकडून येणार्‍या वाऱ्याबरोबर महाराष्ट्रावर आले तर मग अवकाळी पाऊस व गारपीट घेऊन येऊ शकतात.
पण ही शक्यता कमी वाटते कारण हवेचा दाब उत्तरेकडून दक्षिणेकडे सध्यातरी दिसत आहे.

सॅटेलाइट फोटो क्रमांक-२ मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही भागावर किरकोळ ढगाळ वातावरण दिवसभर बनून राहील....


कोकण विभागातील रत्नागिरीचा सह्याद्री पर्वताकडील भाग किरकोळ ढगाळ राहील.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा बहुतांशी भाग, सातारा जिल्ह्याचा निम्मा पश्चिम भाग,
सांगली जिल्ह्याचा शिराळा वाळवा पलूस कडेगाव हा भाग....
कोल्हापूर जिल्ह्याचा बहुतांशी भाग,
सोलापुरातील कर्नाटक सीमेवरील काही तालुके हे दिवसभर ढगाळ राहील.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा बहुतांश भाग,
नंदुरबार जवळजवळ सर्व भाग,
धुळे जिल्हाचा उत्तरेकडील सीमेवरील भाग,
जळगाव जिल्हा बऱ्यापैकी संपूर्ण भाग किंचित ढगाळ राहील.

मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्याचा पुणे जिल्ह्या लगतचा जो भाग आहे तो सोडून उर्वरित सर्व भाग,
बीड जिल्ह्याचा पूर्वेकडील सर्व भाग,
औरंगाबादचा काही भाग, लातूरचा पश्चिमेकडील भाग, उस्मानाबादचा निम्मा दक्षिणेकडील भाग,
परभणी,बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांशी भाग किंचित ढगाळ वातावरण निर्माण होईल.

विदर्भात यवतमाळ जिल्ह्याचा  पश्चिम भाग जास्त ढगाळ वातावरण राहू शकते,
अकोला चा बहुतांशी भागही ढगाळ वातावरण असेल, तसेच हिंगोली जिल्हा बऱ्यापैकी ढगांनी व्यापलेला असेल.

घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत व वेळच्या वेळी किंबहुना वेळेच्या आधीच आम्ही तुम्हाला सर्व माहिती व सखोल मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ जेणेकरून तुम्हांला येणाऱ्या परिस्थितीवर थोडीफार तरी मात करता येईल.......!

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*

Wednesday, February 21, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 21/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*

*आज दिनांक २१ फेब्रुवारी २०१८ सकाळी......*

काल जी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती ती बर्‍यापैकी निवळली असून आज दिवसभरात महाराष्ट्रावर वातावरण स्वच्छ व निरभ्र राहील.

खालील सॅॅटेलाइट फोटो क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील उत्तर भाग ज्यामध्ये सर्व जिल्हे येतात....

ठाणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबाद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अशा सर्व जिल्ह्यात....

दक्षिणेकडील सिंधुदुर्ग-गोवा कोल्हापूर सांगली साताराचा काही भाग रत्नागिरी सोलापूर या भागात वातावरणात बाष्प काही प्रमाणात टिकून आहे.. त्यामुळे साधारण उकाडा जास्त जाणवेल......!

तसेच,

खलील सॅटेलाइट फोटो क्रमांक दोनमध्ये दिसत असल्याप्रमाणे विषुववृत्तावर......म्हणजेच खालील फोटो मध्ये शून्य अंशांची जी रेषा आहे.. तिथपासून दहा अंशांच्या रेषेपर्यंत उत्तर व दक्षिण या दोन्ही भागात म्हणजेच "विषुववृत्तीय" प्रदेशात ढगांची एकदमच दाटी कालपासून वाढली असून येणाऱ्या काळात ही चिंतेची बाब असू शकते......

कारण सध्या वाऱ्याचा वेग व दिशा नैऋत्येकडून हिमालयाकडे असल्याने यातील काही दाट ढग हे पुढील काळात म्हणजेच पुढील महिन्यात भारताच्या किंबहुना महाराष्ट्राच्या भूपृष्ठावर येऊन अवकाळी पाऊस घेऊन येण्याची शक्यता आहे.....

भारत सरकारने सूचना दिल्याप्रमाणे येत्या एक-दोन  दिवसानंतर पाऊस व गारपिटीची शक्यता आहे....
*पण* परिस्थिती एवढी भयानक नाही.
कारण सद्यस्थितीला तरी उत्तरेकडून व दक्षिणेकडून ढगांची आगेकूच महाराष्ट्रावर दिसत नाही.
कदाचित आज-उद्या परिस्थिती बदलू शकेल पण परिस्थिती खूपच भयानक असेल असे वाटत नाही.
सर्व समाज माध्यमांमधून व tv चॅनल्समधून जे भासविण्यात येत आहे तेवढी परिस्थिती भयानक असेल असे वाटत नाही तरीही शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतलेली बरी......

खालील व्हिडिओ मध्ये आम्ही आपणास गेल्या 24 तासातील ढगांची व वातावरणातील बाष्प यांची परिस्थिती दाखवीत आहोत...

यातून असा निष्कर्ष निघतो की सध्या तरी वातावरण हे पूर्णपणे शांत असून एक दोन दिवस असेच शांत राहण्याची शक्यता आहे........!

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*

Tuesday, February 20, 2018

हवामान अंदाज २० फेब्रुवारी २०१८.

*नमस्कार मित्रांनो,*
*आज दिनांक २० फेब्रुवारी २०१८.*

वरील व्हिडिओ मध्ये दिसत असल्याप्रमाणे गेल्या चोवीस तासांमध्ये ढगांचा व वातावरणातील बाष्प वरीलप्रमाणे मार्गक्रमण करत असून ते पश्चिमेकडून म्हणजेच अफगाणिस्तान/ पाकिस्तान या भागातून राजस्थानकडे आल्यामुळे चिंतेचे कारण बनले आहे.
हेच ढग येणाऱ्या काळामध्ये उत्तर महाराष्ट्र व महाराष्ट्रातील इतर भागात पाऊस कदाचित गारपीट घेऊन येउ शकतील.....!
आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत पुढे जशी गरज असेल तसे अपडेट करण्यात येईल.
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*
*7303222222*

Monday, February 19, 2018

हवामान अंदाज 19 फेब्रुवारी 2018.

*नमस्कार मित्रांनो,*
*आज दिनांक १९ फेब्रुवारी २०१८.*
उत्तर महाराष्ट्रावर काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसून येईल कारण आफ्रिकेमधील सोमालिया व इथोपिया या देशावरून काही ढग भरकटून गुजरात व उत्तर महाराष्ट्रातील काही तालुक्यांत आले असून त्यामुळे किंचित ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
नंदुरबार धुळे जिल्हा  दिवसभर ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे
तसेच नाशिक मधील उत्तरेकडील काही तालुके दिवसभर कमी-जास्त प्रमाणात ढगाळ राहतील व पुणे जिल्हयातील उत्तरेकडील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भाग व आसपासचा भाग हा काही प्रमाणात ढगाळ दिसून येईल.

अहमदनगर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग किंचित ढगाळ राहण्याची शक्यता आहे कारण तिथे वातावरणात बाष्प अधिक प्रमाणात दिसून येत आहे

ठाणे जिल्हा व कोकण विभागातील मुंबई ,रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,उत्तर व  दक्षिण गोवा हे सर्व जिल्हे वातावरणातील बाष्प अधिक आसल्या कारणाने येथील वातावरण दमट राहील.

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*
*7303222222*

Sunday, February 18, 2018

अवकाळी पाऊस व गारपीट हवामान अंदाज.

आज दिनांक १८ फेब्रुवारी २०१८.*
उत्तर भारतात उपलब्ध असलेले वातावरणातील पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प हे महाराष्ट्र व गुजरात/मध्यप्रदेश सीमेवरती मर्यादित राहून तिथपर्यंतच धुके व थोडीफार थंडी तयार करीत आहे.
तसेच दक्षिण भारतात केरळ तमिळनाडू या राज्यांच्या आसपास वातावरणातील बाष्प व विषुववृत्तावरील पाऊस पाडण्याजोगे ढग मर्यादित राहून उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल देत आहेत.
विषुववृत्तावरील ढगांची दाटी ही येणाऱ्या काळामध्ये काही प्रमाणात अवकाळी पाऊस व किंचित प्रमाणात गारपीट घेऊन येण्याची शक्यता आहे.
कारण आता वाऱ्याची दिशा बदलली असून ते नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हे वारे विषुववृत्तावरील ढग  महाराष्ट्रावर किंबहुना भारतीय जमिनीवर येऊन अवकाळी पाऊस व गारपीट अशी परिस्थिती निर्माण करू शकतात.
आत्ता घाबरून जाण्याचं कारण नाहीये कारण ही परिस्थिती येणाऱ्या काही महिन्यात उद्भवू शकते अशी कोणतीही परिस्थिती आत्ता लगेच उद्भवू शकत नाही. कारण नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग अजून म्हणावा तितका बळकट झाला नाहीये.
त्यामुळे सध्यातरी फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिट यांची शक्यता कमी आहे.
सध्या महाराष्ट्रावर कोरडे वातावरण असून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे तसेच पहाटे व संध्याकाळी तापमान किंचित कमी जाणवत आहे त्यामुळे थंडी बोचरी जाणवत असेल कारण वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे व महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये वारे वेगवेगळ्या दिशेतून मार्गक्रमण करत आहेत.
सरतेशेवटी वाढणाऱ्या उन्हाच्या कडाक्यामुळे तब्येतीवर परिणाम होवू शकतो त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी.
तसेच शेती क्षेत्रासाठी विशेष सल्ला असा की उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जमिनीतील उपलब्ध पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढत चालला असून त्यासाठी शेतीमध्ये जमिनीवर आवश्यक तेवढे नैसर्गिक आच्छादन निर्माण करून आपण नैसर्गिक गांडूळ व सूक्ष्म जीवजंतूंचे संरक्षण करावे कारण येणार्‍या उन्हाळ्यात हेच गांडूळ व सूक्ष्म जीवजंतू आपल्याला चांगल्या दर्जाचे पिक देणार आहेत.
निसर्ग आपल्याला एवढे भरभरून देत असताना आपणही त्या निसर्गाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*
*7303222222*

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद