Showing posts with label Mahafruit. Show all posts
Showing posts with label Mahafruit. Show all posts

Monday, February 20, 2023

सर्वोत्तम बेदाणा निर्मितीसाठी महाकृषी चं सनशाईन डिपिंग ऑईल.


द्राक्षापासून बेदाणा निर्मितीचे तंत्र आता सिद्ध झाले आहे, परंतु उत्तम बेदाणे निर्मितीसाठी आवश्यक आहे योग्य प्रकारचे डिपिंग ऑईल आणि पोटॅशियम कार्बोनेट. यासाठीच "चंद्रक्रांती फार्मस्" ने बेदाणा उत्पादकांसाठी आपले नवीन उत्पादन "महाकृषी - सनशाईन" डिपिंग ऑईल हे सदर केले आहे. या उत्पादनाच्या 3 वर्ष यशस्वी ट्रायल घेतलेल्या आहेत. आपल्या बेदाण्याचा नैसर्गिक रंग आणि चव जर आपल्याला टिकवायची असेल तर आपण अवश्य हे उत्पादन वापरवे.

Wednesday, September 13, 2017

महाफ्रुट™च्या माध्यमातुन शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकांपर्यंत.

चंद्रक्रांती फार्म ने आता आपला बेदाणा अथवा किशमिश स्वतः मार्केटिंग करायचे ठरवले आहे, त्यांनी यासाठी आपली स्वतःची वेबसाइट www.mahafruit.com या नावाने सुरु केली आहे.
तसेच त्यांनी आपले प्रॉडक्ट्स ऑनलाइन स्टोर फ्लिफकार्ट™च्या माध्यमातून हि ग्राहकांच्या सेवेत उतरवले आहेत.
एकंदरीत या उपक्रमाचा उद्देश हाच आहे की या माध्यमातून शेतकरी उत्पादकाला हि दोन पैसे जास्त मिळतील आणि ग्राहकाला हि दोन पैसे स्वस्तामध्ये चांगली उत्पादने मिळतील.
आज प्रत्येक शेती मालाची विक्री करत असताना मध्यस्थ अथवा दलालांमार्फत खूप मोट्या प्रमाणात नाफेखोरीच प्रमाण वाढले आहे, त्यामुळे याचा तोटा शेतकरी आणि ग्राहक असा दोघांनाही होत आहे.
त्यामुळेच ग्राहकांनी हि अश्या प्रकारच्या उपक्रमाला सहकार्य करायला हवे.

आपण महाफ्रुट™ ची विविध उत्पादने
www.mahafruit.com अथवा,
www.flipkart.com
या वेबसाइट वरती व्हिझिट करून खरेदी करू शकता.

Saturday, December 4, 2010

नाशिक जिल्हयातील मालेगाव येथे डाळींब महोत्सव - 2010असे राज्यस्तरीय प्रदर्शन संपन्न.



नाशिक जिल्हयातील मालेगाव येथे, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नुकतेच डाळींब महोत्सव २०१० असे राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या महोत्सवात शेतकर्‍यांसाठी डाळींब स्पर्धा ठेवण्यात आली होती.या डाळींब महोत्सवात शेंद्रिय, आरक्ता, भगवा, गणेश या जातीचे डाळींब मांडण्यात आली होती. डाळिंबाविषयी समग्र माहिती लेखात देण्यात आली आहे.

डाळींबाचा इतिहास : 


  • डाळींब फळाचा इतिहास अभ्यासला असता, डाळींबाचे मूळ स्थान इराण समजले जाते. 

  • त्याची लागवड स्पेन, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्रहमदेश, चीन, जपान, अमेरिका व भारत या देशांमध्ये केली जाते. 

  • अफगाणिस्तानातील कंदहार हे डाळींबाचे आगार मानले जाते.

  • डाळींब खाण्यासाठी तसेच औषधीसाठीही वापरले जाते. 

  • त्याचा रस काढून बाटल्यात भरून अधिक काळ टिकवता येतो. 

  • रसात साखरेचे प्रमाण १२ ते १६ टक्के असते. 

  • कृष्ठरोगावर डाळींबाचा रस उपयुक्त मानला जातो. 

  • फळाची साल अमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे.

    डाळींबातील अन्नघटक : डाळींबाच्या प्रत्येक १०० ग्रॅम खाद्य भागात पुढीलप्रमाणे अन्न घटक असतात

  • पाणी ७८ टक्के, प्रथिने १०.६ टक्के, स्निग्ध पदार्थ ४.०१ टक्के, खनिजद्रव्य ०.७ टक्के, तंतुमय पदार्थ ५.१ टक्के, पिष्टमय पदार्थ १४.६ टक्के, कॉल्शियम ०.०१ टक्के, फॉस्फरस ०.०७ टक्के , आयर्न ०.३ टक्के, उष्मांक ६५ कॅलरी, रिबोफ्लेवीन १०० मि.ग्रॅ., जीवनसत्व १६ मि.ग्रॅ हे अन्न घटक समाविष्ठ असतात.

  • डाळेंब हे पिक जरी सर्वसामान्यपणे कोणत्याही हवामानात येऊ शकत असले तरी झाडाची वाढ व उत्पादन क्षमता समशितोष्ण व कोरडया हवामानात उत्तम असते. 

  • चांगल्या प्रतीची फळे मिळण्यासाठी फळांची वाढ होत असतांना हवेत आद्रतेचे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे. 

  • दमट हवामानात फळांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.तसेच फळे तडकण्याचे प्रमाण जास्त असते. 

  • डाळींबासाठी मध्यम प्रकारची व उत्तम निचर्‍याची जमीन निवडावी.

  • जमिनीची निवड केल्यावर उन्हाळ्यात तिची चांगली मशागत करावी.

  • २-३ वेळेस उभी आडवी नांगरून कुळवून घ्यावी. 

  • हलक्या हलक्या व मध्यम जमिनीत खड्डे तयार करून २० ते २५ किलो शेणखत, १ किलो सुपर फॉस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने भरावेत.

  • सर्वसाधारणपणे चौरस पध्दतीने लागवड केल्यास पावसाच्या १-२ सरी पडून गेल्यावर प्रत्येक खडयात एक याप्रमाणे कलमांची लागवड करावी. 

  • कलमाभोवतालची माती हलक्या हाताने दाबून घेऊन कलम सरळ व ताठ राहील याची काळजी घ्यावी लागते.

    डाळींबाच्या प्रमुख जाती : 

  • भारतात डाळींबाचे निरनिराळे प्रकार लागवडीखाली असून त्याच्या फळांचे आकारमान,रंग,गुणवत्ता, बियांचा मऊपणा, चव,दाण्यांचा रंग इत्यादी मध्ये खूपच विविधता आढळते. 

  • आळंदी, मस्कलरेड, काबूल, कंधारी, गणेश, १३७, भगवा/शेंद्री, आरक्ता, मृदूला सिडलेस या जाती असून आज महाराष्ट्रात भगवा / शेंद्री या जातीची सर्वाधिक लागवड आढळून येते. 

  • त्यापाठोपाठ गणेश, आरक्ता व मृदुला या जातीची लागवड उल्लेखनीय दिसते.

  • डाळींबाच्या झाडाला फुले लागल्यापासून फळ तयार होण्यास साधारण ५ ते ६ महिने लागतात. 

  • आंबे बहाराची ही फळे जून ते ऑगस्ट व मृग बहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात तयार होतात.

  • डाळींबावर पडणार्‍या रोगाने आज सर्वच डाळींब उत्पादकांना त्रासून सोडले आहे. 

  • हा रोग 'झान्योमोनस' या जिवाणू् बॅक्टेरियामुळे होतो. 

  • यासाठी स्वच्छता मोहिम, बहार नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन पीक संरक्षण या ठळक बाबी रोग नियंत्रणासाठी अवलंबविल्या जातात. 

  • रोगांच्या बंदोबस्तासाठी एकात्मिक किड नियंत्रण पध्दतीचा अवलंब करावा. 

  • कीड रोग येण्याआधीपासून बागेची नियमित स्वच्छता ठेवावी. 

  • कल्चरल प्रॅक्टीसेस वापरून कीड रोग नियंत्रणात ठेवावे. 

  • जैविक उपायांचा जास्तीत जास्त वापर करावा.

  • झाडांची प्रतिकार क्षमता कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे.

  • देवेंद्र पाटील



  • 'महान्यूज'मधील मजकूर

    Popular Keywords

    अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती