Showing posts with label पीक. Show all posts
Showing posts with label पीक. Show all posts

Friday, July 22, 2011

गादीवाफा पद्धतीचा कांदा पिकाला फायदा


या वर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची नजर आता कांदा पिकाकडे वळतेय. मात्र हे पिक घेताना पारंपारिक पद्धती ऐवजी संशोधन केंद्रान शिफारस केलेल्या गादीवाफा पद्धतीने उत्पन्न घेतल्यास चांगल्या प्रतीच भरगोस कांदा उत्पादन घेता येत. याच शिफारशींचा वापर पुणे जिल्ह्यातील ओतूर भागातले अनेक शेतकरी करताना दिसत आहेत.
पिंपळवंडीच्या मंगेश वामन यांनी रब्बी कांद्याची लागवड गादी वाफा पद्धतीन सुरु केलीय. यात ठिबक सिंचनाचा वापरही त्यांनी प्रामुख्यान केलाय. यामुळं शेतमजुरी तर वाचणारच आहे. त्यासोबतच वीज भारनियमन असतानाही कांद्याला पाणी देता येणार आहे. कांद्याचं पिक या वर्षी फायदेशीर ठरताना दिसतंय. त्यामुळं मंगेश वामन यांच्या प्रमाणेच इतर शेतकरीही याच पद्धतीचा वापर करताहेत.
कांदा पिक गादी वाफ्यावर घेतल्यान रोगांचा आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पन्न चांगल्या प्रतीच मिळतं. जुन्नर तालुक्यातल्या ओतूर परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा पिक घेतलं जातं. राजगुरुनगर मधल्या कांदा, लसून अनुसंशाधन केंद्रानं शेतकऱ्यांना कांदा पिकाच्या लागवडीविषयी अद्ययावत असं तंत्रज्ञान उपलब्ध केलेलं आहे. याची माहिती शेतकऱ्यांनी देणं आवश्यक आहे. या केंद्रानेही गादी वाफ्यावरच्या लागवडीलाच शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावं असं म्हटलंय.
 गादी वाफ्यामुळं जमीन जास्त काळ भुसभुशीत राहते. जमीन तुडवली जात नाही. ही लागवड पद्धतही अगदी सोपी आहे. गादी वाफ्याची उंची ४५ सेंटीमीटर असावी आणि चर ३० सेंटीमीटर असावा. दोन गादीवाफ्या मधल अंतर १ मीटर असायला हवं. त्यावर ठिबक सिंचनाच्या दोन नळ्या अंथराव्या. ठिबक सिंचनाचा वापर केल्यानं पाण्याचा अपव्यय तर टळतोच सोबतच यातून खताची मात्राही देतायेते. यामुळं प्रत्येक रोपाला योग्य रितीन पाणी आणि खत देता येतं.

यंदा अन्नधान्याचं रेकॉर्डब्रेक उत्पादन होणार

2010-11 या संपलेल्या आर्थिक वर्षात भारतात अन्नधान्याचं सर्वाधिक उत्पन्न घेण्यात आलंय. 2010-11 म्हणजे सरलेल्या वर्षातले कृषि उत्पादनाचे आकडे हे आजपर्यंतचे सर्वाधिक आहेत. यावर्षी 241.56 दशलक्ष टन एवढी अन्नधान्याचं उत्पादन घेण्यात शेतकरी यशस्वी झालेत. यामध्ये गव्हाचं उत्पादन हे तर रेकॉर्डब्रेक म्हणजे 85.93 दशलक्ष टन तर डाळीचं आजवरचं सर्वाधिक म्हणजे 18.09 दशलक्ष मेट्रिक टन झालंय.    

केंद्रीय कृषि सचिव पी.के. बसू यांनी कृषि उत्पादनाचे हे आकडे जाहीर करताना भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीची ही कमाल चांगला मान्सून आणि शेतीमालाच्या आधारभूत किमतीत वाढ केल्यामुळे झाल्याचा दावा केला. त्यांच्यामते चांगला मान्सून आणि एमएसपीच्या वाढवलेल्या किंमती यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यावेळी भरपूर कष्ट करून चांगलं उत्पादन घेतलं. चांगल्या उत्पादनवाढीसाठी पाऊस आणि शेतकऱ्यांचे कष्ट सर्वाधिक महत्वाचं कारण ठरलं असलं तरी सरकारने अपेक्षेप्रमाणेच त्यामध्ये एमएसपी, शेतीसंदर्भातली सरकारची धोरणं याचाही वाटा असल्याचं सांगून स्वतःची पाठ थोपटून घेतलीय. डाळ आणि तेलबियांच्या रेकॉर्ड उत्पादनामुळे यावर्षी भारताला कमीतकमी खाद्यतेल आयात करावं लागेल, अशी आशाही बसू यांनी व्यक्त केली,     
crop
crop
toor dal
toor dal
पूर्व भारतातल्या तब्बल 90 पेक्षाही जास्त जिल्ह्यांमध्ये यावर्षी दुष्काळ असतानाही अन्नधान्याचं अवाढव्य उत्पादन घेणं शक्य झाल्याचा दावा केंद्रीय कृषि सचिवांनी केला. त्याशिवाय गुजरात आणि आंध्र प्रदेशात अतिरिक्त पावसामुळे पिकांचं नुकसान झालं, तर काही भादात किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली. म्हणजे अनेक संकटाचा सामना करूनही रेकॉर्ड ब्रेक उत्पादन भारतीय शेतकरी घेऊ शकतो, असं कृषि मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं. 2020 साठी भारताचं कृषि उत्पादन हे 280 दशलक्ष टन असायला हवं, अशी अपेक्षा पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अलीकडेच व्यक्त केली होती. आताच्या गतीने शेतकऱ्यांनी अन्नधान्याचं उत्पादन घेतलं तर 2020 पूर्वीच आपण 280 दशलक्ष टनाचं उद्दीष्ट साध्य करू शकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

संपलेल्या वर्षासाठी तांदळाचं उद्दीष्ट 89.09 दशलक्ष टन एवढं उद्दीष्ट होतं, तर झालेलं उत्पादन हे तब्बल  95.32 दशलक्ष टन होतं. यामुळे आता तांदळाच्या उद्दीष्टात वाढ करून 102 दशलक्ष टन एवढं करण्यात आलंय. 

याबरोबरच ऊस, कापूस, सोयाबिन यांच्या उत्पादनातही यावर्षी भरीव वाढ झालीय.

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती