कोकणात प्रवेश करताक्षणी पर्यटकांचे स्वागत होते ते काजू, आंबा आणि नारळ-पोफळीच्या दाट झाडींनी. हिरव्यागर्द झाडीतून डोकावणारे पिवळे-लाल काजूबोंड खूपच सुंदर दिसतात. त्याच्या खालच्या बाजूस असलेली काजू बी काढल्यावर उर्वरित बोंड टाकून दिले जातात. शाळेतून जाणारी मुले रस्त्याने असलेल्या झाडांवरची काजूबोंड काढून मजेने खातात.
Showing posts with label Food Processing. Show all posts
Showing posts with label Food Processing. Show all posts
Tuesday, July 17, 2012
काजूबोंड प्रक्रिया : एक नवी दिशा
कोकणात प्रवेश करताक्षणी पर्यटकांचे स्वागत होते ते काजू, आंबा आणि नारळ-पोफळीच्या दाट झाडींनी. हिरव्यागर्द झाडीतून डोकावणारे पिवळे-लाल काजूबोंड खूपच सुंदर दिसतात. त्याच्या खालच्या बाजूस असलेली काजू बी काढल्यावर उर्वरित बोंड टाकून दिले जातात. शाळेतून जाणारी मुले रस्त्याने असलेल्या झाडांवरची काजूबोंड काढून मजेने खातात.
Saturday, September 24, 2011
सहकारातून रोजगार
Thursday, June 16, 2011
कोकणाला कोकमचे वरदान.
कोकमचा उपयोग अत्यंत प्राचीन काळापासून होत आहे. चरकाच्या मते, चिंचेपेक्षा कोकम अधिक गुणकारी आहेत. साधारण १० ते २० मीटरपर्यंत वाढणारी कोकमाची झाडे कोकण, कर्नाटक, मलबार या भागात आढळतात.
झाडांच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. पाने गडद हिरव्या रंगाची असून ती बुकडीच्या पानांच्या आकाराची असतात. उंबराच्या झाडाला जशी फळं लागतात, साधारण तशीच फळं कोकमच्या झाडाला येतात. ती जांभळट गोल आकाराची असतात. प्रथमदर्शनी तरी ती आलुबुखारसारखी दिसतात. या फळांना रातांबे म्हणतात. फळांचा रंग गडद तांबडा असतो. त्याचा मगज खातात.
या फळामध्ये बिया असतात. या बियांपासून तेल काढलं जातं. त्यांच्या बियांपासून १० टक्के तेल निघतं. ते मेणासारखं घट्ट आणि पांढरं असतं. त्याला भिरंडेल, मुठेल तेल किंवा कोकमतेल म्हणतात. त्याचा खाण्यात उपयोग केला जातो. तसंच हे तेल औषधी म्हणूनही ओळखलं जातं. मेणबत्त्या करण्यासाठी तसेच मेणापासून निरनिराळ्या वस्तू बनवण्यासाठी या तेलाचा उपयोग पूर्वी कोकण आणि गोव्यात केला जायचा. निरनिराळ्या प्रकारचे मलम बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो.
रातांब्याची साल वाळवून त्यापासून कोकम तयार केली जातात. कोकम आमसूल, आमसोल किंवा सोलं म्हणूनही ओळखली जातात. कोकण गोव्यात कोकमचा जेवणात चिंचेऐवजी सर्रास उपयोग केला जातो. कारण कोकम चिंचेपेक्षा पथ्यकर आणि पित्तनाशक असतात. ठाणे जिल्ह्यातले आदिवासी सार (सूप) बनवताना चिंचेचा आणि उत्तरेत आंबेलीयाचा जसा उपयोग करतात, अगदी तसाच कोकणी, मालवणी, गोवन लोक कालवण बनवण्यासाठी खासकरुन माशांचे पदार्थ बनवताना कोकमचा वापर करतात. त्यामुळे कोकणी माणसाचं जेवण कोकमशिवाय पूर्ण होत नाही, असंही म्हटलं जातं.
आंबा, काजू आणि फणसानंतर कोकणी माणसाचा जीव की प्राण कोण, असं विचारल की डोळ्यासमोर येतात ते रातांबे. प्रथमदर्शनी आलुबुखारसारखे दिसणारे जांभळट गोल आकाराच्या रातांब्यापासून कोकम, आगळ, कोकम सरबत आणि तेल तयार केलं जातं. रातांब्यांचा पित्तनाशक गुणधर्म पाहता आहारात त्यांचा उपयोग आवर्जून केला गेला पाहिजे.
मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोकमचा उपयोग सरबतासाठी केला जातो. उन्हाळ्यात तृष्णाशामक, पित्तनाशक आणि पाचक म्हणून कोकम सरबताचा उपयोग केला जातो. कोकममुळे कोकणी बेरोजगार तरुणांना काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाला आहे. कोकमच्या फळांचा जो रस असतो, त्याला आगोळ म्हणतात. या रसापासून सरबत बनवता येते.
Thursday, March 31, 2011
पुरंदर तालुक्यात साकारताहेत सीताफळ गर उत्पादन प्रकल्प.
विद्यानगरी, उद्योगनगरी म्हणून ओळखले जाणारे पुणे फलोत्पादन क्षेत्रातही अग्रेसर ठरत आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले आहे. येथील पुरंदर तालुका सीताफळाचे आगर म्हणून सुपरिचित आहे. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्या या तालुक्यात सुमारे १२०० शेतकरी एकत्र येऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाने आणि शासनाच्या कृषि विभागाच्या मदतीने सीताफळ गर उत्पादन प्रकल्प साकारत आहेत.
पुरंदर तालुक्यात बागायती क्षेत्र व सिंचनक्षेत्रही कमी आहे. फळ पिकाचे क्षेत्र ७ हजार ३५० हेक्टर असून यात प्रामुख्याने सीताफळ, अंजीर, चिक्कू व डाळींब ही प्रमुख फळपिके होतात. या भागात वाटाणा व टोमॅटो देखील मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. पुरंदर तालुक्यात केवळ सीताफळाखालील क्षेत्र २ हजार ५० हेक्टर आहे. बाजारात सीताफळाला मोठय़ा प्रमाणावर मागणी असूनही हे फळ लवकर खराब होत असल्यामुळे शेतकर्यांना हे फळ कमी दराने विकावे लागते. त्यामुळे त्यांना फायदाही कमी होतो. सीताफळाचा गर काढून त्यावर प्रक्रिया केल्यास वर्षभर टिकत असल्याने सीताफळाची थेट विक्री करण्यापेक्षा योग्यवेळी योग्य भावाने हा गर विकता येईल, या उद्देशातून येथे सीताफळ गर उत्पादन प्रकल्प साकारत आहे.
या तालुक्यातील विविध गावांतील सुमारे १२०० शेतकर्यांनी एकत्र येऊन २४ प्रकल्पांची उभारणी केली आहे. एका प्रकल्पामध्ये ३० ते ४० शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यासाठी २५लाख रुपये खर्च अपेक्षित असून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ४० टक्के म्हणजेच ९ लाख ६० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. या प्रकल्पातील २० प्रकल्प सहकारी तत्त्वावर तर ४ प्रकल्प खाजगी तत्वावरील आहेत. प्रत्येक प्रकल्पातून किमान ३० महिलांना रोजगार उपलब्ध होणार असून २४ प्रकल्पाद्वारे सुमारे ७५० महिलांना रोजगार उपलब्ध होईल.
या प्रकल्पासंदर्भात कृषि उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर यांनी सांगितले की, डोंगराळ भाग असणार्या पुरंदर तालुक्याच्या विकासासाठी शेतकर्यांची प्रगती होणे गरजेचे आहे हे ध्यानात घेऊन खासदर सुप्रिया सुळे यांच्या प्रेरणेतून व तालुक्यातील शेतकर्यांच्या सहकार्यातून प्रकल्प उभारण्याचे ठरले व त्यादृष्टीने कामही सुरु झाले आहे. एक प्रकल्प १५०० चौ. फूट जागेत उभारण्यात येणार असून यात तयार झालेला माल मोठे उत्पादक, विक्रेत्यांना विक्री करता येईल. तसेच प्रकल्प सुरु झाल्यानंतर गावांचा एकत्रित संघ स्थापन करुन कॉमन ब्रॅण्ड व मार्केटिंग करण्याचाही विचार आहे. या प्रकल्पामध्ये साधारणपणे ५० टन सीताफळ पल्प, २० ते २५ टन टोमॅटो प्युरी, ५ ते १० टन पर्यंत इतर फळांचा पल्प व ३ ते ५ टनापर्यंत लोणच्यासाठी कैरीच्या फोडी करण्याचे काम होणार असल्याने वर्षभर या महिलांना रोजगार उपलब्ध होईल. याबरोबरच भाजीपाला पॉकिंग करण्यासारखे उद्योगही येथे केले जातील. सर्वसाधारणपणे जुलैमध्ये या प्रकल्पातून उत्पादन सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी सर्व तयारी सुरु आहे.
भौगोलिकदृष्टय़ा दुष्काळी भागात मोडत असलेल्या पुरंदर तालुक्यात सीताफळ गर उत्पादन प्रकल्प उभारल्यास या भागातील शेतकर्यांना निश्चितच फायदा होऊन शेतकर्यांबरोबरच बचतगटातील महिलांनाही गावातच रोजगार निर्मिती होईल आणि तालुक्याचा आर्थिक विकासही घडेल हे निश्चित.!
Sunday, February 20, 2011
आवळा प्रक्रिया उद्योगाने दाखविली यशाची वाट
केवळ परंपरागत शेती न करता फळबागेकडे वळून त्यावर घरीच प्रक्रिया करुन त्याचे उत्पादन बाजारात विकल्याने जास्त नफा मिळतो. याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू रेल्वे स्टेशन येथील सय्यद खुर्शीद व पत्नी अनिसा कौसर यांना आला आहे.
बोरगाव येथे राहणार्या या दाम्पत्याकडे ९ एकर शेती आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड भागात राज्य शासनाच्या कृषि विभागाने आवळा व त्याचे उपपदार्थ यासंदर्भाने अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यामध्ये सय्यद खुर्शीद यांच्यासह ५० शेतकरी सहभागी झाले होते. दहा दिवसांच्या या अभ्यास दौर्यात आवळा उत्पादनाचे तंत्र व प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळाली. व्यावसायिक शेतीच्या वाटचालीत आवळा हे फायद्याचे पीक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दौर्यावरुन परतल्यानंतर सैय्यद खुर्शीद यांनी अनिसा कौसर यांना त्यासंदर्भात माहिती दिली.
त्यानंतर या दाम्पत्याने आवळा शेती व प्रक्रिया उद्योगाची वाट धरण्याचा निर्धार घेतला. सन २००० मध्ये राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांनी पाच एकर श्रेत्रावर सात बाय सात मीटर अंतरावर सुमारे ४०० झाडे लावली. यातील ३०० झाडे वाचली. हा आवळा खुल्या बाजारपेठेत न विकता त्यावर प्रक्रिया करुन ते उत्पादन बाजारपेठेत विकण्याचा मनोदय सय्यद खुर्शीद यांनी व्यक्त केला. त्यांची पत्नी अनिसा कौसर यांनी त्यांची साथ दिली.
त्यांनी कौसर ऍग्रो महिला गृह उद्योग स्थापन केला. या उद्योगांतर्गत स्वत:च्या तंत्रज्ञानाने आवळा लाडवाची निर्मिती केली. यासोबतच सुपारी, कॅन्डी, सरबत, केशतेल आदी पदार्थ त्यांनी तयार केले. आपले उत्पादन कमिशन तत्त्वावर इतरांना न देता स्वत: कृषि प्रदर्शनी, भागवत सप्ताह यात्रांमध्ये याची विक्री करतात.
या विक्री व्यवसायास दरवर्षी कुरणखेड येथील चंडिका देवी संस्थान येथील नवरात्रौत्सवापासून सुरुवात केली जाते. सद्या जनतेत आरोग्यदायी आवळ्याबाबत जनजागृती वाढल्याने त्यांच्या या उत्पादनास चांगली मागणी आहे. मॉल किंवा दुकानामध्ये उत्पादन विक्रीस ठेवल्यास संबंधित व्यवसायिकाला २० टक्के कमिशन द्यावे लागते. त्याचबरोबर ४ टक्के जकात कर, आवळा लाडूच्या पॉकिंगकरिता लागणारे आकर्षक डब्बे, कागदी कटोरा, याकरिता २ रुपये ७० पैसे, कॅन्डीच्या पॉकिंगकरिता ७० पैसे, आवळा सुपारी ७० पैसे असा खर्च येतो.
ऑक्टोबर ते जानेवारी हा आवळ्याचा सिजन असून या कालावधीत आवळ्याचे पदार्थ तयार करण्यात येतात. याकरिता या परिसरातील सहा महिला व दोन पुरुषांनाही या दाम्पत्याच्या कल्पकतेमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. परिसरातील शेतकरीही आता या दाम्पत्याचा आदर्श घेऊन आपला व्यवसाय थाटण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
'महान्यूज
Tuesday, February 8, 2011
मिनी डाळ मिल प्रक्रिया उद्योगासाठी ठरली आहे वरदान.
तुरीवर प्रक्रिया करून डाळ बनवण्यासाठी मिनी डाळ मिल बनवण्यात आली आहे.
याचे फायदे म्हणजे तशी १२५ किलो डाळीवर प्रक्रिया करता येवू शकते आणि
याच्यापासून ७५ % उतारा मिळू शकतो. तूर, मुग, उडीद, हरभरा या दालीसाठी हि मिनी डाळ मिल अत्यंत औप्योगी आहे. संपूर्ण माहिती वाचा अग्रोवोन मध्ये.

Thursday, January 20, 2011
आवळा प्रक्रिया उद्योगाने दाखविली यशाची वाट..
केवळ परंपरागत शेती न करता फळबागेकडे वळून त्यावर घरीच प्रक्रिया करुन त्याचे उत्पादन बाजारात विकल्याने जास्त नफा मिळतो. याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू रेल्वे स्टेशन येथील सय्यद खुर्शीद व पत्नी अनिसा कौसर यांना आला आहे.
बोरगाव येथे राहणार्या या दाम्पत्याकडे ९ एकर शेती आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड भागात राज्य शासनाच्या कृषि विभागाने आवळा व त्याचे उपपदार्थ यासंदर्भाने अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यामध्ये सय्यद खुर्शीद यांच्यासह ५० शेतकरी सहभागी झाले होते. दहा दिवसांच्या या अभ्यास दौर्यात आवळा उत्पादनाचे तंत्र व प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळाली. व्यावसायिक शेतीच्या वाटचालीत आवळा हे फायद्याचे पीक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दौर्यावरुन परतल्यानंतर सैय्यद खुर्शीद यांनी अनिसा कौसर यांना त्यासंदर्भात माहिती दिली.
त्यानंतर या दाम्पत्याने आवळा शेती व प्रक्रिया उद्योगाची वाट धरण्याचा निर्धार घेतला. सन २००० मध्ये राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांनी पाच एकर श्रेत्रावर सात बाय सात मीटर अंतरावर सुमारे ४०० झाडे लावली. यातील ३०० झाडे वाचली. हा आवळा खुल्या बाजारपेठेत न विकता त्यावर प्रक्रिया करुन ते उत्पादन बाजारपेठेत विकण्याचा मनोदय सय्यद खुर्शीद यांनी व्यक्त केला. त्यांची पत्नी अनिसा कौसर यांनी त्यांची साथ दिली.
त्यांनी कौसर ऍग्रो महिला गृह उद्योग स्थापन केला. या उद्योगांतर्गत स्वत:च्या तंत्रज्ञानाने आवळा लाडवाची निर्मिती केली. यासोबतच सुपारी, कॅन्डी, सरबत, केशतेल आदी पदार्थ त्यांनी तयार केले. आपले उत्पादन कमिशन तत्त्वावर इतरांना न देता स्वत: कृषि प्रदर्शनी, भागवत सप्ताह यात्रांमध्ये याची विक्री करतात.
या विक्री व्यवसायास दरवर्षी कुरणखेड येथील चंडिका देवी संस्थान येथील नवरात्रौत्सवापासून सुरुवात केली जाते. सद्या जनतेत आरोग्यदायी आवळ्याबाबत जनजागृती वाढल्याने त्यांच्या या उत्पादनास चांगली मागणी आहे. मॉल किंवा दुकानामध्ये उत्पादन विक्रीस ठेवल्यास संबंधित व्यवसायिकाला २० टक्के कमिशन द्यावे लागते. त्याचबरोबर ४ टक्के जकात कर, आवळा लाडूच्या पॉकिंगकरिता लागणारे आकर्षक डब्बे, कागदी कटोरा, याकरिता २ रुपये ७० पैसे, कॅन्डीच्या पॉकिंगकरिता ७० पैसे, आवळा सुपारी ७० पैसे असा खर्च येतो.
ऑक्टोबर ते जानेवारी हा आवळ्याचा सिजन असून या कालावधीत आवळ्याचे पदार्थ तयार करण्यात येतात. याकरिता या परिसरातील सहा महिला व दोन पुरुषांनाही या दाम्पत्याच्या कल्पकतेमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. परिसरातील शेतकरीही आता या दाम्पत्याचा आदर्श घेऊन आपला व्यवसाय थाटण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
'महान्यूज'मधील मजकूर.
Friday, January 14, 2011
स्ट्रॉबेरी उत्पादक आता प्रक्रिया उद्योगात उतरणार...
महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आता स्वत:च प्रक्रिया उद्योगाकडे वळले आहेत. यंदाच्या स्ट्रॉबेरी महोत्सवात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्यांनी आपल्या उत्पादनाव्दारे स्ट्रॉबेरीची चमक नागरिकांना विशेषत: पर्यटकांना दाखविली आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आता स्वत:च प्रक्रिया उद्योगाकडे वळल्याने स्ट्रॉबेरीचा आस्वाद सर्वसामान्य ग्राहकांना घेता येणार आहे.
अलिकडील काही वर्षांपासू¬न महाबळेश्वर तालुक्यातील शेतकर्यांचा स्ट्रॉबेरी उत्पाद
नाकडे कल वाढला आहे. तसेच तरूणवर्ग स्ट्रॉबेरी शेतीकडे मोठय़ा प्रमाणावर आकर्षित झाला आहे. यंदा या पिकासाठी हवामान पोषक राहिल्याने उत्पादन चांगले आले आहे. भविष्यातही हे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने येथील शेतकरी आतापासूनच प्रक्रियेच्या रूपाने स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी बाजारपेठ मिळविण्याच्या तयारीला लागला आहे.
स्ट्रॉबेरीचा प्रसार व्हावा यासाठी गेल्या तीन वर्षांपासून महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी महोत्सवाचे मोठय़ा उत्साहाने आयोजन करण्यात येथील शेतकर्यांनी पुढाकार घेतला आहे. अखिल भारतीय स्ट्रॉबेरी उत्पादन संघ आणि मॅप्रो फुड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणार्या या महोत्सवासाठी वर्षागणिक पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे शेतकर्याला स्थानिक पातळीवरच काही प्रमाणात बाजारपेठा उपलब्ध होत आहेत. या महोत्सवाची लोकप्रियता आणि पर्यटकांची संख्या यांना डोळ्यासमोर ठेवून स्ट्रॉबेरी उत्पादक संघातर्फे या महोत्सवात प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून विक्रीला ठेवले जातात.
स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योगाकडे अलीकडे शेतकर्यांबरोबरच स्थानिक बचतगटांनीही मोठा सहभाग घेतला आहे. मनुक्याप्रमाणेच स्ट्रॉबेरी ज्यूस, स्ट्रॉबेरी पोळी, स्ट्रॉबेरी चमचम असे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ शेतकर्यांनी तयार केले आहेत. त्यासाठी स्थानिक बचतगटांतील महिलांना सहभागी करून घेण्यात आले आहे. भविष्यात शेतकर्यांबरोबरच बचतगटांतील महिलांनाही अन्नप्रक्रिया परवाना घ्यायला लावून त्यांच्यामार्फत विविध स्ट्रॉबेरी उत्पादने बनविण्याचा मानस आहे. त्यामुळे महिलांनाही बचतगटाच्या माध्यमातून हक्काचा रोजगार मिळू लागला आहे.
आतापर्यंत देशातील विविध बाजारपेठांत स्ट्रॉबेरी फळांची विक्री करण्याबरोबरच येथील शेतकरी स्थानिक प्रक्रिया उद्योगांनाही स्ट्रॉबेरी पुरवू लागला आहे. पण आता त्याच्याही पुढे एक पाऊल टाकत शेतकरी स्वत:च प्रक्रिया उद्योगाकडे वळल्याने अतिरिक्त स्ट्रॉबेरी उत्पादनापासून प्रक्रियेद्वारे पदार्थ तयार होऊन शेतकर्यांना आर्थिक लाभ मिळण्याबरोबरच स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योगामध्ये त्यांची खास ओळखही निर्माण होणार आहे.
स्ट्रॉबेरी उत्पादनावर प्रक्रिया करून ते विविध स्वादांत आणि प्रकारांत ग्राहकांसमोर ठेवले, तर ते ग्राहकांना नक्कीच आवडणार, नेमके हेच सूत्र हेरून येथील शेतकर्यांनी प्रथमच स्ट्रॉबेरी मनुका तयार केला आहे. ज्याप्रमाणे द्राक्षापासून तयार होणारा मनुका वर्षभर टिकतो आणि खाणार्याला कोणत्याही हंगामात द्राक्षाच्या स्वादाची आठवण करून देतो, त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरीपासून तयार झालेला मनुकाही वर्षभर टिकाणारा आहे. त्यामुळे कोणत्याही हंगामात स्ट्रॉबेरीप्रेमींना स्ट्रॉबेरीचा स्वाद चाखता येईल.
स्ट्रॉबेरीच्या फळात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि शर्करेचे प्रमाण कमी असते. यामुळे द्राक्षाच्या तुलनेत स्ट्रॉबेरी मनुका तयार करायला अधिक काळ लागतो. साधारण ५२ तासांची ही प्रक्रिया असून त्यासाठी पुण्याच्या तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले आहे. मनुका तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरीची प्रतवारी आवश्यक असते. विशेष म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे रसायनविरहित अशी आहे. साडेतीन किलो स्ट्रॉबेरीपासून साधारणत: एक किलो मनुका मिळतो. सध्या प्राथमिक अवस्थेत असलेली मनुका निर्मिती पुढील काळात वाढविण्यात येणार असल्याची माहिती स्ट्रॉबेरी उत्पादक नितीन भिलारे यांनी दिली.
'महान्यूज'मधील मजकूर
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Keywords
अंजीर
अंतरपिक
अन्नधान्य
अन्नसुरक्षा अभियान
आंबा
आदिवासी
आधुनिक पोल्ट्री व्यवसाय
आवळा
इस्त्रो
उपमुख्यमंत्री
उस
ऊस
ऊसतोडणी
ऍग्रो टुरिझम
कर्जमाफी
कांदा
कात
कापूस
कारले
कीडनियंत्रण
कुक्कुटपालन
कृषि उत्पन्न बाजारसमिति
कृषि योजना
कृषी दिन
कृषी विद्यापीठ
कृषीतंत्र
कृषीमंत्री
केळी
कोकम
कोळंबी
खते
खरबूज
गहू
जमिन
जलसंधारन
झरा
ट्रक्टर
ठिबक
डाळिंब
डाळींब महोत्सव - 2010
ढोबळी मिरची
तलाव
तुर
तेल्या
दुग्धव्यवसाय
दॅट उपकरण
द्राक्ष
निर्यात
निलक्रांती
पाणी
पाणी अडवा
पाणी जिरवा
पान
पीक
पुरंदर
पृथ्वीराज चव्हाण
प्रक्रिया उद्योग
फलोत्पादन
फळबाग
फायटोप्थोरा
बचत गट
बटाटा
बागाईतदार
बाजारपेठ
बाजारभाव
बायोगॅस
बियाणांची गुणवत्ता
बी-बियाणे उपलब्धता
बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival.
भाजीपाला.
भात
भेंडी
मच्छिमार
मजूर
मत्स्य व्यवसाय
मधशाळा
मधुमक्षिका पालन
मराठवाडा कृषी विद्यापीठ
महा-रेन
महाकृषी
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो
महिको
महिला अणि कृषि क्षेत्र
माती परीक्षण
मिरची
मोसंबी
यशोगाथा
रेशीम
रेशीम उद्योग
रोग-नियंत्रण.
वनराई बंधारे
वीज निर्मीती
वृक्षायुर्वेद
शिवामृत
शेडनेट हाऊस
शेतकरी
शेततळे.
शेती
शेती व्यवसाय
शेतीपूरक व्यवसाय
शेतीशाळा
शेतीसाठी हवामानाचा सल्ला
समूह शेती
साखर
साखर कारखाना
सिंचन प्रकल्प
सीताफल
सेंद्रिय शेती
सोनेरी हळद
सोयाबीन
स्ट्रोबेरी
स्वाभिमानी शेतकरी संघटना
हरितक्रांती
हळद
“पिवळी क्रांती
Popular Keywords
7/12
Acts/Rules
Agriculture
Agrowon
Biogas
Blue green algae
Contact Action .
Crop Protection
Dairy
Drip Irrigation
FAO
Ferilizer
Fertilizer contol order
Fertilizer general information
Food
Food Processing
Fruits
Global Worming
Grapes
HACCP
Haritkranti 2010
History of pome.
Horticulture
Indian farmer
Insectiside
Kashmir
Keshar
Land Holding
MPKV
MSAMB
Mahafruit
Mahakrushi
Mango
Milk
Monsanto
NRC Grapes
National seed acts/rules.
Onion
Pesticides
Pestiside
Pomegranate
Poultry Feed
Poultry business
Price
Prutviraj Chavhan
Pulses
Seed general information
Seed production
Strawberry
Strawberry Producer
Subsidy
Sugarcane
Systemic
Type of action.Fumigent
USDA
University
Vegetables
Water resources
Wheat
World Agriculture
weather forcasting