Showing posts with label पाणी. Show all posts
Showing posts with label पाणी. Show all posts
Sunday, October 16, 2011
शेतक-यांनी तयार केली पाण्याची बँक
Wednesday, October 12, 2011
बंधा-यात पाणी...... ग्रामस्थ समाधानी
पंढरपूर तालुक्यातील राजकीयदृष्टया संवेदनशील असणारे गाव म्हणून गादेगावचा उल्लेख होतो. गावाच्या विकासाबाबत येथील नागरिक सदैव जागरुक असतात. पंढरपूर तालुक्याच्या पश्च्चिमेला असणा-या व सुमारे १० हजार लोकसंख्या असलेल्या गादेगाव मध्ये प्रशासन व जनता एक विधायक कामासाठी एकत्र आली आणि त्यातून उभे राहिले एक सकारात्मक कार्य.
या गावाच्या पश्चिमेस ओढयावर बांधण्यात आलेल्या शिवकालीन पाणी साठवण बंधा-याच्या भिंतीतून पाण्याची गळती होत असल्याने तलावामध्ये पाणी साठवणूक होत नव्हती.यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांचे हाल होत होते. यावर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येवून गळती दुरुस्त करण्याबाबत ग्रामपंचायतीला सुचविले. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही गळती दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.
या गावाच्या पश्चिमेस ओढयावर बांधण्यात आलेल्या शिवकालीन पाणी साठवण बंधा-याच्या भिंतीतून पाण्याची गळती होत असल्याने तलावामध्ये पाणी साठवणूक होत नव्हती.यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांचे हाल होत होते. यावर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येवून गळती दुरुस्त करण्याबाबत ग्रामपंचायतीला सुचविले. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही गळती दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.
Thursday, October 6, 2011
जलसंधारणामुळे लोधवड्यात पाणीच पाणी
उन्हाळ्यात लोधवडेकरांच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत असे, ही स्थिती बदलायला हवी हे समजत होते, पण त्यासाठी काय करावे हेच गावकऱ्यांना उमजत नव्हते. याच दरम्यान गावचे सुपुत्र व सध्याचे कृषि सचिव प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून इंडोजर्मन प्रकल्पाचे फादर रॉबर्ट डिकोस्टा यांनी गावाला भेट दिली आणि लोधवडेकरांच्या भाग्योदयास सुरवात झाली. या प्रकल्पाची सुरवात गावात करण्यात आल्याने अनेकांना रोजगराही मिळाला. सुरवातीला लोकांनी श्रमदानातून काम करून इंडोजर्मनच्या परीक्षेत ग्रामस्थांनी बाजी मारली.
Tuesday, July 19, 2011
महा-रेन प्रणाली
दैनंदिन पर्जन्यमानाची मोजणी ही अत्यंत क्लिष्ट व वेळखाऊ प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ व वेळही अधिक लागतो आणि चूकाही होऊ शकतात. मानवी चुका व वेळ वाचविण्यासाठी महा-रेन या संकेतस्थळाची निर्मिती ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए.एल.ज-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मॅग्नम ओपस यांच्या तांत्रिक सहकार्याने करण्यात आली आहे. या संकेतस्थळाच्या नाविण्यपूर्ण निर्मितीमध्ये ठाणे जिल्हयाने राज्यात प्रथम मान मिळविला आहे.
पावसाच्या आकडेवारीचा उपयोग विविध योजना राबविण्यासाठी, सांख्यिकीय माहितीसाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरण अंमलबजावणीसाठी केला जातो. कृषि आणि तत्सम क्षेत्रासाठी जेथे पीक पध्दती पावसावर अवलंबून आहे तेथे ही आकडेवारी अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणून पर्जन्यमानाची आकडेवारी अचूक असणे आवश्यक आहे. यावर उपाय योजना करण्याच्या उद्देशाने नवीन संकेतस्थळ निर्मितीची संकल्पना पुढे आली आणि ती साकारही झाली. संकेतस्थळाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात नुकताच करण्यात आला.
Thursday, June 2, 2011
थेंबे थेंबे झरा साचे.
मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी बेभरवश्याच्या पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आता उपलब्ध जलस्त्रोत अधिक काळजीपूर्वक वापरले तरच निभाव लागण्याची शक्यता आहे. याच उद्देशाने झरे बांधणीचा एक प्रकल्प ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात राबविला जात आहे. थेंबे थेंबे झरा साचे असे या कामाचे स्वरुप असून त्यामुळे प्रदेशातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
पावसाळ्यानंतर साधारणपणे पुढील दोन-अडीच महिने पाणी डोंगर उतारावरुन नाल्यांच्या स्वरुपात वाहत असते. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हे झरे जिवंत असतात. या झऱ्यांना छोटे बांध घालून त्याचे पाणी अडविले, तर मार्च महिन्यापर्यंत झरा जिवंत राहतो आणि स्थानिकांना त्यातून पाणी मिळू शकते.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून असे अनेक झरे उताराच्या दिशेने वाहत असतात. जल व्यवस्थापन तज्ञ विलास पारावे यांनी रायगड, रत्नागिरी तसेच ठाणे जिल्ह्यात विविध स्वयंसेवी संस्था आणि कंपन्यांच्या माध्यमातून असे तब्बल १७० झरे बांधणी प्रकल्प उभारले आहेत. तूर्त स्थानिक जनता आणि त्यांच्या जनावरांची तहान या छोट्या झऱ्यांच्या पाण्यातून भागविता येईल, असा विचार या प्रकल्पांच्या उभारणीमागे आहे.
या योजनेला झऱ्याचे तोंड बांधणे असेही म्हणतात. दोन ते तीन फुट उंचीची भिंत उभारुन झऱ्याचे पाणी अडविले जाते. त्यामुळे त्याचे आयुष्य दीड ते दोन महिन्यांनी वाढते. मग एरवी जानेवारी महिन्यात आटणारा झरा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाझरतो. त्याचा दुसरा फायदा म्हणजे आसपासच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढते.
पेट्रोकेमिकलमधे इंजिनीअरींग केलेले विलास पारावे सुरुवातीची सहा वर्षे नोकरी केल्यानंतर आता गेली अकरा वर्ष पूर्णवेळ जलव्यवस्थापन तज्ञ म्हणून काम करत आहेत. युटीव्हीसोबत त्यांनी सुरुवातीस रायगड जिल्ह्यात काम केले. २००८ मध्ये ब्रिज संस्थेसोबत त्यांनी काही प्रकल्प साकारले .आता ते स्वतंत्रपणे काम पाहतात.
एका झऱ्याचे तोंड बांधण्यासाठी साधारण तीस हजार रुपये खर्च येतो आणि साधारण २० वर्षे या योजनेतून खात्रीपूर्वक पाणी मिळू शकते, असे श्री. पारावे सांगतात. बांध घालून पाणी अडविलेल्या एका झऱ्यापासून एका गावाला अथवा पाड्याला मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी खात्रीपूर्वक पाणी मिळू शकते.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात २२ तर जव्हार आणि मोखाडा तालुक्यात प्रत्येकी दोन झरे प्रकल्प साकारण्यात आले आहेत. काही कॉर्पोरेट कंपन्या प्रायोजक म्हणून या प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या असून त्यांच्या सहकार्यातून दरवर्षी काही प्रकल्प साकारले जात आहेत.
Monday, May 30, 2011
सुप्त पाण्याच्या झ-याव्दारे ओंढेवाडीस मिळाले पाणी.
सर्वसामान्यांमध्ये एक प्रचलित उक्ती आहे गाव करी ते राव काय करी याप्रमाणे नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यातील औंढेवाडी या गावातील ग्रामस्थांनी ७० दिवस श्रमदान करुन स्वत: पुरुष , स्त्री मुले राबत राहून गावासाठी पूर्ण पाण्याचा स्त्रोत शोधला आणि आपल्या गावासाठी पाणी पुरवठा करण्याची योजना कार्यान्वीत केली. हे खरोखरच आदर्शवत काम आहे.
सिन्नर तालुक्यातील सिन्नर घोटी महामार्गापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेले औंढेवाडी हे आदिवासी बहुल वस्तीचे गाव. पाटबंधारे विभाग, मेरी यांच्या सहकार्याने युवामित्र या समाजसेवी संस्थेच्या प्रयत्नाने येथील डोंगरावरील नैसर्गिक ढोल्या झ-याचे पाणी गावात पोहविण्याचे महत्वपूर्ण काम करुन गावास पाणी उपलब्ध करुन देण्यात आले.
औंढेवाडी हे ८०० लोकवस्तीचे गाव असून या प्रयत्नाने गावाची पाणी टंचाई दूर होणार असून ग्रामस्थांना पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायपीट करण्याची गरज उरली नाही. औंढेवाडी जवळील डोंगरावर सुप्त पाण्याचा झरा होता. याची माहिती युवामित्र संस्थेचे प्रमुख सुनील पोटे व मनीषा पोटे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थ, पाटबंधारे खात्याचे अभियंता अविनाश लोखंडे व मेरीचे कार्यकारी अभियंता डॉ. संजय बेलसरे यांच्या मदतीने या झ-याचा शोध घेतला.
हा झरा खुप जुना असून त्यात बारामाही पाणी असते. मात्र या झ-याचा आवाज होऊन पाणी लुप्त होत असते. या पाण्याचा आवाज होत असल्याने त्याला ढोल्या झरा असे नाव पडले. या झ-याचा उपयोग करुन गावाची पाणी टंचाई दूर करता येईल. या विचाराने पोटे यांनी सर्व ग्रामस्थांना प्रेरित केले. पुण्याचे युवा उद्योजक सोमदत्त लाड यांनी या प्रकल्पासाठी एक लाख रुपये दिले तर पुण्यातील एचडीएफसी बँकेतील अधिकारी ज्युडा रॉड्डीज यांनी बँकेतील इतर कर्मचा-यांच्या सहकार्याने ७० हजार रुपये मदत मिळवून दिली. त्या आधारे पाईप, सिमेंट वाळू इत्यादीची जमवाजमव करुन ग्रामस्थांनी परिश्रम घेऊन एक महिन्यातच १२० मीटर उंचीवरुन हे पाणी गावात आणले.
या पाणी योजनेसाठी दररोज २० ग्रामस्थ व शेवटच्या काही दिवसात रोज ७० लहान थोर, स्त्री पुरुष गावकरी राबत होते. यामुळे गावास दररोज दीड लाख लिटर पाणी उपलब्ध होत आहे. गावाच्या गरजेच्या मानाने हे पाणी तिप्पट असून, जादा पाण्याचा वापर शेतीसाठीही करण्यात येणार आहे.
सामूहिक प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे गावासाठी पाणी योजनेचे मोठे यश उभे राहिले आहे तसेच रस्ते , वीज, आरोग्य विषयक , विविध कामे करुन ओंढेवाडी गाव आदर्श करण्याचा संकल्पही ग्रामस्थानी केला. यासाठी ग्रामस्थांचे कौतुकच करावयास हवे.
Friday, January 14, 2011
जलसंधारणातून उन्नती साधली आहे मोरेगाव येथे कृषीधन पाणी वापर संस्थेने.
शेतीला पाणी मिळाले तर शेतकर्यांच्या जीवनात नंदनवन निर्माण होऊ शकते. पावसाचे पाणी वाहून गेले तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. पावसाचे पाणी अडविण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना यशस्वी होण्यासाठी लोकांचाही सहभाग आवश्यक असतो.
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे कृषीधन पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून दुधना नदीवरील कोल्हापूरी बंधार्यात दरवर्षी पाणी अडवून निस्वार्थ सेवा होत आहे. साठवलेल्या पाण्याचा शेतकरी शेतातील पिकासाठी वापर करतात. त्याच बरोबर या परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीतही यामुळे वाढ झाली आहे.
जिल्हा परिषदेने मोरेगाव येथील दुधना नदीवरील १७२ दरवाज्याचा कोल्हापुरी बंधारा बांधून २००२ मध्ये मोरेगाव येथील कृषीधन पाणी वापर संस्थेकडे हस्तांतरित केला. तेव्हापासून ही संस्था प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये या बंधार्यात पाणी अडवित आहे. या पाण्याचा वापर मोरेगाव, ब्राम्हणगाव, वाघपिंपरी, घोडके पिंपरी, हादगाव येथील शेतकरी आपल्या शेतातील पिकांसाठी करतात. हे पाणी फेब्रुवारीपर्यंत राहत असल्यामुळे कापूस, तूर, ज्वारी, गहू या पिकांना या पाण्याचा लाभ मिळतो.
परिसरातील गावांत असणार्या पाणीपुरवठय़ाच्या विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. सेलू शहराला पाणीपुरवठा करणार्या वाघपिंपरी येथील विहिरीच्या पाणी पातळीत देखील वृध्दी झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण हे दरवर्षी पाणी अडवून पाणी वितरित करण्याची जबाबदारी पार पाडतात. यावर्षी सप्टेंबर २०१० मध्ये बंधार्यातील सर्व दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होऊ नये म्हणून प्लॉस्टिक लावण्यात आले आहे. सध्या या बंधार्यात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. वळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी या बंधार्यास भेट देऊन जलपूजन केले. त्यावेळी श्री. वळवी यांनी या सातत्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. या कामासाठी अध्यक्ष श्री. चव्हाळ, मोरेगावचे सरपंच किशोर चव्हाळ, ब्राम्हणगावचे सरपंच मदन डोईफोडे, डॉ. परमेश्वर लांडे, संतोष डोईफोडे, काशिनाथ मगर आदी परिश्रम घेत आहेत. हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे.
'महान्यूज'मधील मजकूर.
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Keywords
अंजीर
अंतरपिक
अन्नधान्य
अन्नसुरक्षा अभियान
आंबा
आदिवासी
आधुनिक पोल्ट्री व्यवसाय
आवळा
इस्त्रो
उपमुख्यमंत्री
उस
ऊस
ऊसतोडणी
ऍग्रो टुरिझम
कर्जमाफी
कांदा
कात
कापूस
कारले
कीडनियंत्रण
कुक्कुटपालन
कृषि उत्पन्न बाजारसमिति
कृषि योजना
कृषी दिन
कृषी विद्यापीठ
कृषीतंत्र
कृषीमंत्री
केळी
कोकम
कोळंबी
खते
खरबूज
गहू
जमिन
जलसंधारन
झरा
ट्रक्टर
ठिबक
डाळिंब
डाळींब महोत्सव - 2010
ढोबळी मिरची
तलाव
तुर
तेल्या
दुग्धव्यवसाय
दॅट उपकरण
द्राक्ष
निर्यात
निलक्रांती
पाणी
पाणी अडवा
पाणी जिरवा
पान
पीक
पुरंदर
पृथ्वीराज चव्हाण
प्रक्रिया उद्योग
फलोत्पादन
फळबाग
फायटोप्थोरा
बचत गट
बटाटा
बागाईतदार
बाजारपेठ
बाजारभाव
बायोगॅस
बियाणांची गुणवत्ता
बी-बियाणे उपलब्धता
बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival.
भाजीपाला.
भात
भेंडी
मच्छिमार
मजूर
मत्स्य व्यवसाय
मधशाळा
मधुमक्षिका पालन
मराठवाडा कृषी विद्यापीठ
महा-रेन
महाकृषी
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो
महिको
महिला अणि कृषि क्षेत्र
माती परीक्षण
मिरची
मोसंबी
यशोगाथा
रेशीम
रेशीम उद्योग
रोग-नियंत्रण.
वनराई बंधारे
वीज निर्मीती
वृक्षायुर्वेद
शिवामृत
शेडनेट हाऊस
शेतकरी
शेततळे.
शेती
शेती व्यवसाय
शेतीपूरक व्यवसाय
शेतीशाळा
शेतीसाठी हवामानाचा सल्ला
समूह शेती
साखर
साखर कारखाना
सिंचन प्रकल्प
सीताफल
सेंद्रिय शेती
सोनेरी हळद
सोयाबीन
स्ट्रोबेरी
स्वाभिमानी शेतकरी संघटना
हरितक्रांती
हळद
“पिवळी क्रांती
Popular Keywords
7/12
Acts/Rules
Agriculture
Agrowon
Biogas
Blue green algae
Contact Action .
Crop Protection
Dairy
Drip Irrigation
FAO
Ferilizer
Fertilizer contol order
Fertilizer general information
Food
Food Processing
Fruits
Global Worming
Grapes
HACCP
Haritkranti 2010
History of pome.
Horticulture
Indian farmer
Insectiside
Kashmir
Keshar
Land Holding
MPKV
MSAMB
Mahafruit
Mahakrushi
Mango
Milk
Monsanto
NRC Grapes
National seed acts/rules.
Onion
Pesticides
Pestiside
Pomegranate
Poultry Feed
Poultry business
Price
Prutviraj Chavhan
Pulses
Seed general information
Seed production
Strawberry
Strawberry Producer
Subsidy
Sugarcane
Systemic
Type of action.Fumigent
USDA
University
Vegetables
Water resources
Wheat
World Agriculture
weather forcasting