प्रत्येकी अवघ्या दहा गुंठ्यामध्ये सुरु असलेला हा प्रयोग उत्तर सोलापूर तालुक्यासाठीच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही पथदर्शी ठरत असून इस्त्रायलच्या धर्तीवर सेडनेटमधील ग्रुप फार्मिंगचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे प्रयोगशील शेतकरी अंकुश टोणपे यांनी सांगितले.
Showing posts with label शेती. Show all posts
Showing posts with label शेती. Show all posts
Sunday, April 1, 2012
युवक शेतकऱ्यांनी धरली गटशेतीची वाट
Tuesday, November 1, 2011
शेतकऱ्याची मुलगी ठरली ७ अब्जावं बाळ
लखनौ : एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेलं कन्यारत्न म्हणजेच नरगिस ही मुलगी जगातील ७ अब्जावं बाळं म्हणून निवडली गेली आहे. भारतात मुलींच्या भ्रूण हत्येवर लक्ष केंद्रित करण्याचा हा उद्देश आहे. बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या प्लान इंटरनॅशनलच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मळगाव येथे नरगिस ही मुलगी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी जन्माला आली.
नरगिस ही मुलगी जगात जन्माला येणारं ७ अब्जावं बाळ आहे.प्लान इंटरनॅशनलच्या मते नरगिसला प्रतिकात्मक म्हणून निवडण्यात आलंय, कारण जगात ७ अब्जावं कोणतं बाळ जन्माला आलं, हे सांगण कठीण आहे.
फिलिपाईन्समध्येही मनिलात जन्माला आलेल्या एका मुलीला प्रतिकात्मक म्हणून ७ अब्जावं बाळ म्हणून घोषित करण्यात आलंय. भारतात प्रत्येक मिनिटाला ५१ मुलांचा जन्म होतो. त्यातील ११ मुलंही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात जन्म घेतात.
नरगिस ही मुलगी जगात जन्माला येणारं ७ अब्जावं बाळ आहे.प्लान इंटरनॅशनलच्या मते नरगिसला प्रतिकात्मक म्हणून निवडण्यात आलंय, कारण जगात ७ अब्जावं कोणतं बाळ जन्माला आलं, हे सांगण कठीण आहे.
फिलिपाईन्समध्येही मनिलात जन्माला आलेल्या एका मुलीला प्रतिकात्मक म्हणून ७ अब्जावं बाळ म्हणून घोषित करण्यात आलंय. भारतात प्रत्येक मिनिटाला ५१ मुलांचा जन्म होतो. त्यातील ११ मुलंही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात जन्म घेतात.
Thursday, October 6, 2011
जमिनीच्या पुनर्मोजणी संदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय - मुख्यमंत्री
राज्यातील भूमि पुनर्मोजणीसंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईत केले.
राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (NLRMP)अंतर्गत भू -मापन संदर्भात जमाबंदी आयुक्त आणि संचालक चंद्रकांत दळवी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले, त्यावेळी ते बोलत होते.
या सादरीकरणास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री आर.आर.पाटील, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजीव अग्रवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव एस.के. श्रीवास्तव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. नितीन करीर व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Wednesday, July 13, 2011
अल्प भुधारक शेतकरी बनला १५ एकर शेतीचा मालक
चामोर्शी तालुक्यातील तांबाशी येथील अल्पभुधारक शेतकरी गणपती सातपुते यांने शुन्यातुन विश्व निर्माण करीत मेहनतीच्या जोरावर पडिक जमिनीवर उत्पादन घेऊन आर्थिक प्रगती साधली . भुमिहीन गणपती सातपुते आज १५ एकर शेतीचा मालक बनला आहे.
शेती परवडत नाही असे म्हणत कित्येंकांनी शेती करणे सोडून दिले आहे. मुळचा अल्पभुधारक असलेला गणपती सुरवातीला दुस-यांच्या शेतात मजुर म्हणून राबायचा. मजुरीवर गणपतीचे कुटुंब चालत होते. मजुरीच्या जोरावर प्रगती साधली जाणार नाही हे लक्षात येताच गणपतीने दुस-यांची शेती ठेका पध्दतीने करण्यास सुरुवात केली. अथक परिश्रमातुन नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन गणपतीने उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला गणपती सातपुतेला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. इतरांची शेती ठेक्याने घ्यायची म्हणजे पदरी पैसा असावा लागतो. मात्र मजुरीच्या भरवश्यावर कुटुंबाची गाडी चालवायची की शेती करायची असा प्रश्न गणपतीला पडला. परंतु गणपतीला आपल्या मेहनीवर पुर्ण विश्वास होता.
गणपतीने शाळेत प्रवेश केला मात्र पहिल्याच वर्गात त्याने रामराम ठोकला. वयाच्या आठव्या वर्षी जमिनदाराची चाकरी पत्करली. संयुक्त कुटुंबात खाण्याची चणचण सर्वाना मजुरी करणे आवश्यक होते. त्यामुळै गणपतीने शिक्षणाचा नाद सोडून दिला. गणपतीच्या हिश्याला वडीलोपार्जीत नाममात्र एक एकर शेती आली.
Saturday, June 25, 2011
तलावातील गाळ ठरतोय शेतीसाठी वरदान.
महागड्या रासायनिक खताला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यामुळे शेती उत्पन्नावर चांगला परिणाम झाल्याने तलावातील गाळ बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.
दरवर्षी रासायनिक खताचे भाव वाढत चालले आहेत. निर्सगाच्या लहरीपणामुळे शेतामध्ये लागवड करण्यात आलेल्या पिकासाठी शेतकऱ्यांना महागडे खत आणि किटकनाशकाचा वापर करावा लागत आहे. पिकासाठी महागडे खत वापरल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या खर्चाची तोंडमिळवणी होणे कठीत होत चालले आहे.
गेल्या दोन तीन वर्षापासून लोणार तालुक्यातील अंभोरा, पिंपळनेर, टिटवी, देऊळगाव कुंडपाळ या तलावामधून पाणी आटलेल्या जागेवरुन गाळ उपसून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महसूल विभागातून नाममात्र परवाना शुल्क घेऊन तलावातील गाळ काढून नेण्यासाठी परवानगी दिली जात होती. यावर्षी मात्र शासनाने तलावातील गाळ नेण्यासाठी परवाना शुल्क माफ करुन जेसीबीद्वारे खोदकाम करुन तलावातून गाळ घेतल्यास आणि शेतकऱ्याने त्याबाबतचे कागदपत्र आणि छायाचित्र दिल्यास अनुदानावर डिझेल खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे.
सद्य स्थितीत पिंपळनेर व अंभोरा तलावातून परिसरातील शेतकरी ट्रॅक्टरद्वारे गाळ घेऊन त्यांच्या शेतात टाकत आहेत. तलावातील गाळामुळे परिसरातील नदी-नाल्यांमधून बरीच खनिजद्रव्ये पाण्यासोबत वाहून येतात. ती गाळात मिसळली जातात. हा गाळ शेतात टाकल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरी आता महागड्या खताला पर्याय म्हणून आपल्या शेतात तलावातील गाळ टाकत आहेत. हा गाळ त्यांच्या पिकासाठी जणू संजीवनी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
Friday, January 14, 2011
कुमठय़ात साकारली समूह शेती...
सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षित दहा तरुणांनी एकत्र येऊन एकविचाराने समूह शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. समुह शेतीचा उपक्रम यशस्वीपणे राबवून कुमठे येथील तरुणांनी शेतकर्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. हा उपक्रम अधिक फायदेशीर करुन शेतकर्यांना या प्रकल्पाकडे आकर्षित करण्यात हे तरुण यशस्वी ठरले आहेत. जिद्द आणि परिश्रमाव्दारे समूह शेतीतून आधुनिक कृषितंत्रज्ञानाव्दारे स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्याचा नवा प्रयोग १० युवक शेतकर्यांनी करुन सार्या महाराष्ट्रासमोर समूहशेतीचा नवा पायंडा निर्माण केला आहे.
कोरेगाव तालुक्यातील कुमठे गाव हे तालुक्यात सर्व क्षेत्रात स्वकर्तुत्वाने लौकिक प्राप्त केला आहे. गावाला शैक्षणिक बाबतीत मोठा वारसा लाभला आहे. गावात सुशिक्षितांचे प्रमाणही चांगले आहे. पाण्याची सुविधा असल्यामुळे गावातील जवळपास सर्वच शेती बागायती झाली आहे. नोकरीनिमित्त येथील तरूण मुंबई, पुणे, सातारा या ठिकाणी आहेत. नोकरीच्या मागे न लागता उत्तम शेती करुन स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनण्याचा निर्धार करुन सचिन शिंदे यांनी आधुनिक शेतीचा मंत्र जोपासला.
कुमठे गावातील सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन शिंदे यांनी मुंबईतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून कुमठे गावीच प्रगतीशील शेती करण्याचा निर्णय घेतला. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी याप्रमाणे वाटचाल करण्याचा ठाम निर्णयही श्री. शिंदे यांनी घेतला. कुमठे गावात आल्यानंतर श्री. शिंदे यांनी प्रगतीशील आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्याचा आपला विचार गावातील सहचारी मित्रांसमोर मांडला. मित्रांनीही त्यांच्या या विचाराला पुष्ठी दिली.
यामध्ये श्री. शिंदे यांचे गावातील जीवलग दहा मित्र श्रीकांत कोरडे, सिद्धार्थ साबू, अनिल जाधव, युवराज निकम, रमेश जगदाळे, प्रकाश जगदाळे, सचिन जगदाळे, किरण चव्हाण, शंकर सणस व मंगेश शिंदे या सर्वांनी मिळून समूह शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनी त्यांनी वार्षिक खंडाने घेतल्या. भविष्यवेध ऍग्रो या संस्थेची सहकारी तत्त्वावर स्थापना करून कुमठे व मुंबई येथे कार्यालय सुरू केले. डिसेंबर २००८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या भविष्यवेधने पाच एकर क्षेत्रात सुरूवातीस ढोबळी मिरचीचे आधुनिक पद्धतीने उत्पादन घेतले. सहा महिन्यात ढोबळी मिरचीचे १५३ टन उत्पादन त्यांनी घेतले. याच दरम्यान शेतातील सर्व प्रकारची कामे स्वत: सर्वांनी करायची ठरले. यामुळे मजुरीसाठी लागणार्या पैशांची बचत होऊ लागली. स्वत:चा माल ते स्वत: बाजारपेठेत मुंबई, पुणे येथे पाठवू लागले.
यंदाच्या हंगामामध्ये भविष्यवेधने बीट, कोबी, फ्लॉवर, आले, टोमॅटो, कारले, काकडी यासरखी पिके घेउन त्यांना मुंबईत मोठी बाजारपेठही मिळविली. आजपर्यंत या संस्थेने आधुनिक शेतीपध्दती आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन पैसे मिळवून देणारे शेती उत्पन्न घेतल्याने भविष्यवेध ऍग्रो या संस्थेची उलाढाल २५ लाखांपर्यंत झाली आहे.
भविष्यवेधचे सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे होतात. संस्थेचा वार्षिक ताळेबंद केला जातो. आगामी काळात शेतीसाठी निगडीत उद्योगधंदे उभारणे, शेतकर्यांच्या शेतीसहली आयोजित करणे, युवकांना शेतीक्षेत्रातील तसेच रोजगार स्वयंरोजगाराचे मोफत मार्गदर्शन व प्रेरणा देण्यात पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी भविष्यवेध ऍग्रो संस्थेकडून मार्गदर्शन घेऊन शेतीमधून चांगले उत्पन्न मिळविले आहे.
नोकरीच्या मागे न लागता शेतीमधूनसुद्धा चांगले उत्पन्न मिळू शकते. कुमठेतील सचिन शिंदे आणि सहकारी मित्रांनी समूहशेतीचा प्रयोग यशस्वी केला असून हा प्रयोग जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात एक आदर्श उदाहरण ठरत आहे.
'महान्यूज'मधील मजकूर.
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Keywords
अंजीर
अंतरपिक
अन्नधान्य
अन्नसुरक्षा अभियान
आंबा
आदिवासी
आधुनिक पोल्ट्री व्यवसाय
आवळा
इस्त्रो
उपमुख्यमंत्री
उस
ऊस
ऊसतोडणी
ऍग्रो टुरिझम
कर्जमाफी
कांदा
कात
कापूस
कारले
कीडनियंत्रण
कुक्कुटपालन
कृषि उत्पन्न बाजारसमिति
कृषि योजना
कृषी दिन
कृषी विद्यापीठ
कृषीतंत्र
कृषीमंत्री
केळी
कोकम
कोळंबी
खते
खरबूज
गहू
जमिन
जलसंधारन
झरा
ट्रक्टर
ठिबक
डाळिंब
डाळींब महोत्सव - 2010
ढोबळी मिरची
तलाव
तुर
तेल्या
दुग्धव्यवसाय
दॅट उपकरण
द्राक्ष
निर्यात
निलक्रांती
पाणी
पाणी अडवा
पाणी जिरवा
पान
पीक
पुरंदर
पृथ्वीराज चव्हाण
प्रक्रिया उद्योग
फलोत्पादन
फळबाग
फायटोप्थोरा
बचत गट
बटाटा
बागाईतदार
बाजारपेठ
बाजारभाव
बायोगॅस
बियाणांची गुणवत्ता
बी-बियाणे उपलब्धता
बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival.
भाजीपाला.
भात
भेंडी
मच्छिमार
मजूर
मत्स्य व्यवसाय
मधशाळा
मधुमक्षिका पालन
मराठवाडा कृषी विद्यापीठ
महा-रेन
महाकृषी
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो
महिको
महिला अणि कृषि क्षेत्र
माती परीक्षण
मिरची
मोसंबी
यशोगाथा
रेशीम
रेशीम उद्योग
रोग-नियंत्रण.
वनराई बंधारे
वीज निर्मीती
वृक्षायुर्वेद
शिवामृत
शेडनेट हाऊस
शेतकरी
शेततळे.
शेती
शेती व्यवसाय
शेतीपूरक व्यवसाय
शेतीशाळा
शेतीसाठी हवामानाचा सल्ला
समूह शेती
साखर
साखर कारखाना
सिंचन प्रकल्प
सीताफल
सेंद्रिय शेती
सोनेरी हळद
सोयाबीन
स्ट्रोबेरी
स्वाभिमानी शेतकरी संघटना
हरितक्रांती
हळद
“पिवळी क्रांती
Popular Keywords
7/12
Acts/Rules
Agriculture
Agrowon
Biogas
Blue green algae
Contact Action .
Crop Protection
Dairy
Drip Irrigation
FAO
Ferilizer
Fertilizer contol order
Fertilizer general information
Food
Food Processing
Fruits
Global Worming
Grapes
HACCP
Haritkranti 2010
History of pome.
Horticulture
Indian farmer
Insectiside
Kashmir
Keshar
Land Holding
MPKV
MSAMB
Mahafruit
Mahakrushi
Mango
Milk
Monsanto
NRC Grapes
National seed acts/rules.
Onion
Pesticides
Pestiside
Pomegranate
Poultry Feed
Poultry business
Price
Prutviraj Chavhan
Pulses
Seed general information
Seed production
Strawberry
Strawberry Producer
Subsidy
Sugarcane
Systemic
Type of action.Fumigent
USDA
University
Vegetables
Water resources
Wheat
World Agriculture
weather forcasting