शेतीवर जीवापाड प्रेम आणि शासन योजनेचा आधार घेऊन रेमडे डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आरे गावातील शेतकरी संतोष भिसे यांनी वडिलोपार्जित लाल मातीत शासन योजनेतून मिळालेल्या पॉवर टिलरच्या माध्यमातून योग्य मशागतीद्वारे सोन्यासारखं पीक निर्माण केलं आहे. पडिक जमीन असल्याने पूर्वी भिसे यांना इतरांच्या शेतावर मोलमजुरी करुन दिवसाकाठी सव्वाशे रुपयांची मजूरी मिळत असे. मात्र, पॉवर टिलरच्या माध्यमातून आज भिसे दिवसाला ३६०० रुपयांची मजुरी मिळवत आहेत. ही क्रांती केवळ शासन योजनेच्या माध्यमातून झाल्याचे स्पष्ट मत संतोष भिसे यांनी व्यक्त केले.
शेतीच्या विकासातून आर्थिक परिवर्तन करण्याच्या ध्येयाने प्रेरित होवून सातारा तालुक्यातील आरे गावचे शेतकरी संतोष भिसे यांनी वडिलोपार्जित ३ एकर शेतीचा शासन योजनांचा लाभ घेवून खऱ्या अर्थाने विकास घडविला आहे. दोन वर्षपूर्वी पडिक असणाऱ्या त्यांच्या ३ एकर जमिनीमध्ये जवाहर विहीर योजनेतर्गत विहीर घेवून पाण्याची उपलब्धता केली. पाण्यापाठोपाठ त्यांनी शेतीमशागतीसाठी सामाजिक न्याय विभागाकडून पॉवर टिलर मिळवून आधुनिक शेतीचं नव पर्व निर्माण केलं आहे.
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द शेतकऱ्यांसाठी अनेकविध योजना राबविल्या जात आहेत. यापैकी पॉवर टिलर ही योजना शंभर टक्के अनुदानातून राबविली जात आहे. सातारा जिल्ह्यात गतवर्षी १०४ लाभार्थींना लॉटरी पध्दतीने पॉवर टिलर देण्यात आले. बहुतांशी शेतकऱ्यांच्या जीवनात पॉवर टिलर योजनेमुळे आर्थिक परिवर्तनाचा नवा मार्ग सापडल्याचे स्पष्ट दिसत आहे. याच योजनेचे आरे गावचे शेतकरी संतोष भिसे हे ही एक यशस्वी लाभार्थी आहेत.
श्री. भिसे यांनी आपल्या शेतीविषयक प्रगतीबाबत बोलताना सांगितले की, वडिलोपार्जित ३ एकर जिरायत शेती होती. या शेतीमध्ये कोणतेही उत्पादन होत नव्हते. या जमिनीकडे केवळ पडिक जमिन म्हणून पाहिले जात होते. जमिन असून नसल्यासारखी अवस्था भिसे कुटुंबियांची होती. त्यामुळे संतोष भिसे यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरीसाठी जावे लागत होते. मजुरीवर संसाराचा गाडा चालवावा लागत असल्यामुळे भिसे कुटुंबियांची फारच आर्थिक कुचंबणा व्हायची. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संतोष यांनी विकासाच्या शासन योजनांचा लाभ घेण्याचा संकल्प करुन कृषी विभाग तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची मदत घेतली.
श्री. भिसे यांनी शेतीची सुधारणा मनावर घेतली आणि पंचायत समितीच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी आपल्या शेतात जवाहर विहीर घेतली. त्यांच्या प्रयत्नांना आणि जिद्दीला यश आले आणि सुदैवाने या विहीरीस पाणीही बऱ्यापैकी लागले. शेतात पाणी उपलब्ध झाल्याने भिसे कुटुंबियानी नगदी पिके घेण्यास प्रारंभ केला. मात्र पडीक जमिन असल्याने शेती मशागतीस त्यांना मर्यादा पडल्या. पडीक शेतीचा विकास करण्यासाठी त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेतून शंभर टक्के अनुदानातून पॉवर टिलर घेतला. या पॉवर टिलरच्या माध्यमातून पडीक जमिनीचा विकास करुन उत्तम प्रकारे मशागत केली. या पॉवर टिलरला श्री. भिसे यांनी १४ हजार रुपये खर्चून आधुनिक पेरणी यंत्र बसविले. पॉवर टिलरने मशागत केलेल्या शेतीत पेरणीसाठी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत आवश्यक अवजारे तसेच बियाणे मिळविली. स्वत:ची शेती विकसित करण्याबरोबरच इतरांच्या शेतांची मशागत आणि पेरणी करुन आर्थिक उत्पन्नाचे मोठं साधन त्यांनी निर्माण केले आहे. पूर्वी इतरांच्या शेतावर मोलमजुरी करुन दररोज सव्वाशे रुपये मजुरी मिळविणाऱ्या संतोष भिसे यांनी पॉवर टिलरच्या सहाय्याने आधुनिक शेतीचा मंत्र जोपासून स्वत:सह इतरांच्या शेताची मशागत आणि पेरणी करीत आहेत. ते दिवसाला ३ एकर क्षेत्राची पेरणी करत असून त्यासाठी त्यांना ३५०० ते ३६०० रुपये मजुरीच्या रुपाने मिळत आहेत.
पॉवर टिलरमुळे शेतीतील मशागत करणे सोयीचे झाले, शासनाकडून बियाणे मिळवून पेरणी केली, आणि शास्त्रशुध्द मशागत केलेल्या शेतीसाठी जवाहर विहीरीतून पाणी उपलब्ध केले. या साऱ्या शेतीविकासाच्या उपाययोजनामुळे आज भिसे यांच्या शेतात हायब्रिड ज्चारी, सोयाबीन, भुईमुग याबरोबरच भोपळा, मिरची आदी नगदी पिके जोमाने डौलत आहेत. त्यांनी एक एकर क्षेत्रावर हायब्रिड ज्वारी, एक एकर क्षेत्रावर सोयाबीन आणि एक एकर क्षेत्रात भुईमुगाच पिक घेतले. पत्नी छाया भिसे, आई ताराबाई भिसे आणि स्वत: संतोष भिसे यांनी शेतीच्या विकासासाठी जिद्दीने अपार कष्ट उचलले. यासर्व गोष्टीमुळे त्यांनी गेल्यावर्षी आपल्या शेतातून ४० पोती शेंगा, १६ पोती सोयाबीन, १ पोतं तुर याबरोबरच घेवडा, उडीद, चवळी, भोपळा, मिरची अशी उत्तमोत्तम पिके घेतली.
संतोष भिसे आणि त्यांच्या कुटुंबियांनी जिद्द आणि मेहनतीने पडीक असलेल्या जमिनीत शासन योजनांच्या माध्यमातून आज नगदी पिके घेवून आर्थिक परिवर्तनाची नवी दिशा मिळविली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत गतवर्षी घेण्यात आलेल्या सोयबीन पिकाच्या स्पर्धेमध्ये श्री. भिसे यांना सोयाबीन उत्पादनासाठीच्या तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. सेंद्रिय शेतीमध्येही त्यांनी क्रांती घडविली असून सेंद्रिय भोपाळ्याचे उत्पादनही घेतले असून निसर्ग प्रदर्शनात त्यांनी उत्पादित केलेला १५ किलोचा भोपळा ठेवला, त्याच्या या १५ किलोच्या भोपळ्याचे फार कौतुक झाले.
शासन योजनांचा लाभ घेवून प्रगतीशील शेतकरी बनता येते हे संतोष भिसे यांनी दाखवून दिले आहे

No comments:
Post a Comment