Sunday, September 18, 2011

कांद्याच्या निर्यातीबाबत मंगळवारी केंद्रीय मंत्रिगटाच्या बैठकीत निर्णय घेणार - केंद्रीय अर्थमंत्री















कांदा पिकाच्या निर्यातीबाबत मंगळवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिगटाच्या बैठकीत सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील कांदा, साखर निर्यात आणि कापूस पिकाच्या दरवाढीमुळे सूत गिरण्यांवर झालेल्या परिणामावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली. या बैठकीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यातील कांदा, ऊस आणि कापूस या नगदी पिकांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहिती दिली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, वन मंत्री डॉ. पंतगराव कदम, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, कृषी व पणन सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, वस्त्रोद्याग प्रधान सचिव सुनील पोरवाल, सहकार सचिव राजगोपाल देवरा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण देशाच्या उत्पादनात राज्यात एक तृतीयांश कांद्याचे उत्पादन होते. एकूण निर्यातीच्या दोन तृतीयांश निर्यात एकट्या महाराष्ट्रातून होते. कांदा हे खानदेशातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. चालू वर्षी शेतकऱ्यांनी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे कांदा बाजारात विक्रीस आणणे बंद केले आहे. कांद्याची निर्यात बंदी उठवा अशी या भागातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

२०१०-११ मधील साखरेचे शिल्लक उत्पादन ५७.५२ लाख मेट्रिक टन आणि २०११-१२ मध्ये अंदाजे २६० लाख मेट्रिक टन साखरेची यात भर पडणार असल्याने एकूण उपलब्धता ३१७.५२ लाख मेट्रिक टन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ३० मार्च २०१२ पूर्वी १५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस केंद्र शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. याबाबत दसऱ्यानंतर निर्णय घेण्यात येईल असेही केंद्रीय अर्थमंत्री श्री. मुखर्जी यांनी स्पष्ट केले.

राज्यातील एकूण ५८ सहकारी सूत गिरण्यांमधून १४०० लाख किलो यार्न कापूस प्रत्येक वर्षी उत्पादित होतो. राज्यास १०० कोटींचा महसूल यामधून मिळत असून २ हजार १९१ कोटींची गुंतवणूक यामध्ये आहे. कापसाच्या किंमतीत झालेल्या उच्चांकी वाढीमुळे या सूतगिरण्यांना १८० कोटींचा फटका बसला आहे. ज्या बँकांनी त्यांना कर्ज दिले आहे त्याही अडचणीत आल्या आहेत. आता कापसाचा हंगाम लवकरच सुरु होत आहे. अशा वेळी २५० कोटींचे सॉफ्ट लोन पॅकेज उपलब्ध व्हावे असे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मागणी केली. याबाबत अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी शेवटी सांगितले.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद