सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यात वडाचीवाडी हे गाव आहे. येथील विठ्ठल कारंडे हे त्यापैकीच एक उदाहरण म्हणावे लागेल. २००४ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यांतर नोकरीपेक्षा घरच्या शेतीलाच त्यांनी पसंती दिली. परंतू तेच तेच करण्यापेक्षा शेतीत नवे काही करण्याची जिद्द त्यांच्यात होती. त्यातूनच त्यांच्या परिसरातील अरण येथील प्रयोगशील शेतकरी हणमंत गाजरे यांची डाळिंबाची शेती त्यांनी पाहिली. प्रयोगासाठी प्रेरणा मिळाली आणि सुरु झाला विठ्ठल यांचा डाळिंब शेतीतील प्रवास. त्यातच सोलापूरच्या कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी त्यांचा संवाद वाढला. कृषी विज्ञान केंद्राने मध्ये मृग बहार तेल्या रोग व्यवस्थापन अंतर्गत प्रात्यक्षिक घेतले.या प्रात्यक्षिकामध्ये विठ्ठल हे लाभार्थी होते. त्यानंतर केंद्राचे प्रमुख समन्वयक प्रा. लालासाहेब तांबडे, विषय विशेषज्ञ प्रा. सय्यद शाकिर अली, किरण जाधव यांनी त्यांना सातत्याने मार्गदर्शन केले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे(आयसीएआर) महासंचालक डॉ.एस.अय्यप्पन यांनी सोलापूर दौ-यात आवर्जून विठ्ठलच्या बागेला भेट दिली. त्या वेळी बागेची घेतलेली काळजी पाहून अय्यप्पन यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यानंतर थोडी- थोडकी नव्हे, तर तब्बल सहा एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली. माढा तालुक्यातील तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाचे नुकसान झाले. मात्र, त्यानंतर झालेल्या चुका सुधारतानाच नव्याने काही नियोजन केले. पुण्यासह कोलकत्याच्या बाजारपेठेतही डाळिंबे पाठविली. तिथे ८७ ते १४५ रुपयांपर्यंत प्रति किलो भाव मिळाला. त्यातूनच त्यांनी दोन वर्षात १ लाख २० हजार रुपये निव्वळ नफा मिळवला. नैसर्गिक आपत्तीवर मात करीत आणि संघर्षाने बाजारपेठ मिळवित विठ्ठलने एक नवा आदर्श शेतक-यांपुढे ठेवला आहे.
No comments:
Post a Comment