कोरडवाहू शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी काढलेली अमरावती ते कराड ही यात्रा स्थगित केल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली. ही यात्रा सोमवारी विदर्भ, मराठवाड्यातून पुण्यात दाखल झाली. यावेळी बच्चू कडू, विजय जावंधिया, चंद्रकांत वानखेडे यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या मागण्या लवकरच मान्य होतील असं सांगितलं. बच्चू कडू यांच्या मागण्यांपैकी अनेक मागण्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत स्वत: केंद्राकडे पाठपुरावा करणार आहेत. याबाबत एक महिनाभरात योग्य तो निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी आमदार बच्चू कडू यांना सांगितलं. त्यानंतर डेरा आंदोलन स्थगित करत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं.
या मागण्या महिनाभरात मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Starmajha.
Starmajha.
No comments:
Post a Comment