Thursday, August 4, 2011

ठिबक सिंचनातून साधली उत्पादनाची किमया
जालना जिल्ह्यामध्ये शेतीचे सर्व अर्थशास्त्र कापूस या एका पिकावर अवलंबून व आधारलेले आहे. कापूस उत्पादन घेण्यासाठी केला जाणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पादन याचा विचार करता कमी जमीन धारणा असणाऱ्या शेतकऱ्यांना यापासून फारच कमी उत्पादन मिळत असल्याचे चित्र आहे.

सध्याच्या काळामध्ये शासनाच्या विविध योजनांव्दारे जास्त उत्पादन घेण्याचे प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत. पण अशा उद्यमशील व प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. या संख्येमध्येच गणना केली जाऊ शकते असे मौजे मनापूर, ता. भोकरदन, जि. जालना येथील तरुण शेतकरी देवीदास पिराजी दळवी आहेत. वडिलोपार्जित जमीन, मोठे एकत्रित कुटुंब आणि शेतामध्ये पारंपरिक पध्दतीने घेतली जाणारी कापूस, हरभरा, ज्वारी ही पिके यापासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये त्यांच्या कुटुंबाची गरज भागविली जात होती.


कुटुंबामध्ये सहा भाऊ असून सर्वांचे शिक्षण ५ वी ते १२ पर्यंत झालेले आहे. त्यामुळे चांगली नोकरी करुन पोट भरणे शक्य नव्हते. यावेळी देवीदास दळवी यांनी आधुनिक पध्दतीने कमी खर्चात जास्त उत्पन्नाची शेती करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आसपासच्या परिसरातील तालुक्यातील, जिल्ह्यातील यशस्वी प्रयोगशील शेतकऱ्यांची शेती पाहण्यास सुरुवात केली. त्यामधून वेगवेगळी माहिती मिळत गेली.

सन २००९-१० मध्ये स्वत:ची शेती आधुनिक करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला कापूस पिकाचे क्षेत्र कमी केले. ठिबक सिंचनाचा फायदा लक्षात घेऊन शेतामध्ये टप्प्याटप्प्याने ठिबक संच बसविले. एक एकरापासून सुरु केलेले ठिबक पुढे आठ एकरापर्यंत वाढविले. यासाठी शासनाकडून ठिबक सिंचनासाठी मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग करुन घेतला. शेतामध्ये मोहरी, टोमॅटो, सूर्यफूल, बटाटे ही सर्व पिके पट्टा पध्दतीने व ठिबक सिंचनाचा वापर करुन घेतली. टोमॅटोची लागवड ५X१.२५ फुटावर केली. यामध्ये त्यांनी नामधारी सीडस् कंपनीचे शक्तीमान बियाण्याचा वापर केला. एक एकर क्षेत्रासाठी त्यांनी ५० ग्रॅम बियाणे वापरले.

पाच-सहा दिवसांच्या अंतराने दोन तास ठिबकव्दारे पाणी दिले. कीड व रोग नियंत्रणासाठी पेगासस, रेडोमील, ब्लू कॉपर, प्रोक्लेम, नुऑन यासारख्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला. खत व्यवस्थापनामध्ये १०० किलो डीएपी, ५० किलो पोटॅश व २० किलो बेनसल्फ दिले. याव्दारे त्यांनी टोमॅटोचे ३०० क्विंटल उत्पादन घेतले. हरभरा लागवड करताना ३.५.X१.२५ फुटावर पट्टा पध्दतीने लागवड केली. पंधरा गुंठ्यांमध्ये ६ किलो बियाण्याचा वापर केला. डी.ए.पी. सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर केला. ८ ते १० दिवसांनी ३ तासांपर्यंत ठिबकव्दारे पाणी दिले.

घाटे अळी व्यवस्थापनासाठी कृषी सहाय्यक उमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निंबोळी अर्क, फेरोमोन सापळे, पक्षी थांबे यांचा वापर केला. तसेच रासायनिक किटकनाशकामध्ये कोराझोन १० मिली प्रती २० लिटर पाण्यामध्ये वापरले. एकरी १८ क्विंटल उत्पादन घेतले. मिरची व वांग्यासाठी संकरित बियाण्याचा वापर केला. तसेच १९:१९:१९ नायट्रेट, ०:५२:३४ सल्फर सारख्या विद्रव्य खतांचा ठिबकव्दारे वापर केला. तसेच चार दिवसांच्या अंतराने २ तास पाणी दिले. याव्दारे त्यांना मिरचीचे ६ गुंठ्यामध्ये २७ क्विंटल तर वांग्याचे ३० गुंठ्यामध्ये ३२० क्विंटल उत्पादन मिळाले आहे.

या उत्पादनाव्दारे मिळालेल्या पैशात त्यांनी ठिबकसाठी झालेला खर्च वसूल झाल्याचे सांगितले. तसेच कुटुंबाला चांगल्या प्रकारे अर्थिक मदत होत असल्याचे सांगितले. आतापर्यंत इतर बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांची शेती पाहिली व अनुभवली आहे. तेही येणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वागत करुन शेतीमध्ये केलेल्या यशस्वी प्रयोगाची माहिती देतात. या प्रयोगांसाठी तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच खाजगी कंपनीतील प्रतिनिधी यांचे मार्गदर्शन लाभल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद