शासकीय दूध खरेदी व विक्री दरात दि. १ सप्टेंबर २०११ पासून वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
गाईचे दूध खरेदी करण्याचा दर १६ वरुन १७ रुपये करण्यात आला आहे, तर म्हशीचे दूध खरेदीचा दर रुपये २३ वरुन २५ रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे गाईच्या दूध खरेदीत रु. १ तर म्हशीच्या दूध खरेदीच्या दरात २ रुपयाची वाढ करण्यात येणार आहे.
दूध खरेदी दरात वाढ झाल्याने गाईचे दूध व टोण्ड दूध प्रति लिटर विक्री दरात रुपये १.५० व म्हशीचे दूध व फूलक्रिम दूधाच्या विक्री दरात प्रति लिटर ३ रुपयाने वाढ करण्यात येणार आहे.
सध्या राज्यातील सहकारी संस्था, संघ, बहुराज्यीय संघ व एमएमपीओ नोंदणीकृत प्रकल्प यांच्या कमिशनमध्ये २.४० रुपयावरुन २.९० रुपये केल्याने कमिशनमध्ये ५० पैशांनी वाढ करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment