Saturday, July 16, 2011

उसतोडीसाठी सरसावल्या महिला...




सातारा जिल्ह्यातील महिलांनी निव्वळ राजकारणच नाही तर समाजकारण आणि अर्थकारण सकस करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांनी स्वत:हून पुढाकार घेऊन अनेक गावांमध्ये ग्रामविकासाची संकल्पनाच बदलून टाकली असून महिलाच गावकारभारणी झाल्याने गावपातळीवर राजकारण,समाजकारण आणि अर्थकारणाचा पोत बदलू लागला आहे. जावळी,कराड,महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातच्या बहुतांशी गावातील पायाभूत प्रश्नच महिलांनी सोडवून टाकला आहे. ग्रामस्वच्छता असो अथवा दारुबंदी असो, या कामांमध्ये महिला स्वत:ला झोकून देऊन काम करत आहेत. बचत गटांच्या एकजुटीतून त्यांनी दबदबा निर्माण केला आहे. पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील वीसहून अधिक गावांतील महिला दारुबंदीसाठी आक्रमक झाल्या आहेत. केळोली (वरची) आणि कराड तालुक्यातील शेवाळेवाडी-येणपे येथील बचत गटातील महिलांनी 'हम भी किसीसे कम नही...' हे सिध्द करून दाखविले आहे.

पाटण तालुक्यातील चाफळ विभागात महिला दारुबंदीसाठी आक्रमक झाल्या आणि त्यांनी अनेक मद्यपींना पोलीस कोठडीची हवा दाखविली. चाफळ,माचणेवाडी,नानेगाव खुर्द, नानेगाव बुद्रुक, धायटी, पाडळोशी, केळोशी, शिंगणवाडी, वीरेवाडी, डेरवण, बाबरवाडी,मसुगडेवाडी,खराडवाडी,कवठेकरवाडी, सुर्याची वाडी येथे दारुबंदी चळवळ वेगाने वाढत आहे. चोरट्या दारुविक्रेत्यांनी या रणरागिणींच्या कार्यपध्दतीचा धसकाच घेतला आहे. 


निर्मल ग्राम, तंटामुक्त असलेल्या पाटण तालुक्यातील केळोली (वरची) येथील रणरागिणींनी मोठे धाडस दाखविले ८० कुटुंबे आणि ४५० लोकसंख्या असलेल्या केळोलीतील गजानन, भैरवनाथ,दत्तकृपा,वैभवलक्ष्मी,श्रीराम या पाच बचत गटांतील महिला एकत्र जमल्या आणि त्यांनी चोरुन होत असलेल्या दारुविक्रीला पायबंद घातला. जर मद्यपी आढळून आला तर त्याला थेट पोलीस ठाण्यातच हजर केल्यामुळे मद्यपींनीही धसका घेतला. बचतगटातील महिला फक्त दारुबंदीलाच विरोध करत नाहीत तर त्या दर रविवारी हातात झाडू घेऊन गावात स्वच्छता करतात. 

कराड तालुक्यातील शेवाळेवाडी येणपे येथील संत बाळूमामा महिला बचत गटातील रणरागिणींनी हातामध्ये कोयता घेऊन ऊसतोडणी टोळ्यांच्या मनमानीला मोठी चपराक दिली आहे. सुनंदा शेवाळे,मंदा सुर्यवंशी,वंदना सुर्यवंशी,दीपाली शेवाळे,सुनीता शेवाळे,संगीता शेवाळे या महिलांनी ऊसतोड टोळी तयार करुन रयत-शाहू कारखान्यासाठी हजारो टन ऊसतोड केली. यामुळे बचत गटातील महिलांच्या हातातही चार पैसे आले. यामुळे कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत झाली. भविष्यात आणखी काही बचतगटांना प्रेरणा मिळेल. कारखाना व्यवस्थापनाने महिलांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. येणपे-शेवाळेवाडीतील माहिलाही आता ऊसतोडणीसाठी सरसावल्या असून त्यांनी स्वत:चीच ऊसतोड टोळी तयार केली. 

बचतगट आणि राजसत्ता ही ग्रामीण भागातील महिलांच्या प्रगतीची दोन चाके असल्याचे केळोली आणि शेवाळेवाडी-येणपे येथील रणरागिणींनी दाखवून देण्याबरोबच अर्थपूर्ण स्त्रीशक्तीने गावात एकजुटीने दबदबा निर्माण केला आहे. घर,संसार,चूल-मूल हे महिलांचे क्षेत्र तर उंबऱ्यापलीकडील जग पुरूषांचं मानलं गेलं आहे. मात्र बचत गटातील महिलांनी फक्त घरच आमची जबाबदारी नाही तर उंबऱ्यापलीकडील जगातही आम्ही क्रांती करू शकतो, हे चाफळ विभाग, केळोली आणि शेवाळवाडी-येणपे येथील रणरागिणींनी दाखवून दिले आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद