Friday, July 22, 2011

“शेअर” कडून पोलादपूरमध्ये “पिवळी क्रांती”




युटिव्ही कंपनीची सामाजिक जबाबदारी म्हणून कार्यरत असलेल्या शेअर स्वयंसेवी संस्थेने कोकणातील पारंपारिक आंबा,काजू, नारळ आणि भात शेती या पिकांऐवजी शेतामध्ये सोनेरी हळद पिकाची लागवड करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांना प्रवृत्त करीत पोलादपूरसह कोकणात पिवळ्या क्रांतीला सुरु केली. तालुक्यातील १० गावांमध्ये ८ टन हळद पिकाची लागवड करण्यात आल्याने यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे.

तालुका डोंगराळ आणि दुर्गम असल्याने येथील टेबललॅण्ड जमिनीवरच फक्त भातशेती केली जात असे.गेल्या रब्बी हंगामात देवळे भागामध्ये कडधान्याचे बियाणे वाटप करुन “शेअर” स्वयंसेवी संस्थेने शेतकऱ्यांना भातशेतीला पर्याय दिला. शेतकऱ्यांना यामुळे २० एकर जमिनीवर कडधान्य पिक घेऊन चांगला फायदा झाल्याने आता शेतीतून सोने पिकविण्याची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे.

“शेअर” स्वयंसेवी संस्थेने तालुक्यातील देवळ ताम्हाणे, पायटेवाडी, दाभिळ, धामणदिवी, महाळुंगे तामसडे , हळदुळे, फासेवाडी, केवनाळे, दहा गावांमध्ये सुमारे आठ हजार किलो हळदीचे बियाणे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिले आहे. यामुळे हळदीच्या बियाणाची लागवड करण्याचे काम आता जोमाने सुरु झाले आहे.


देवळे गावात गणेश केसरकर ११ गुंठे, आण्णा केसरकर ३ गुंठे , रविंद्र केसरकर ३ गुंठे, ज्ञानदेव केसरकर ३ एकर, जयराम केसरकर १० गुंठे, संतोष केसरकर ३ गुंठे, शंकर केसरकर ३ गुंठे, राजाराम केसरकर २ गुंठे, हरि केसरकर ३ गुंठे, हरि कदम ३ गुंठे, दाभिळमध्ये हणमंत दळवी २० गुंठे, गुणाजी दळवी १० गुंठे, नारायण दळवी १० गुंठे, नामदेव दळवी १० गुंठे धामणदिवीमध्ये १ एकर, महाळुंगेत बाळासाहेब चव्हाण १० गुंठे , तामसडेत तानाजी निकम ३ गुंठे , फासेवाडीत तुकाराम केसरकर ३ गुंठे , हळदुळेतील प्रताप कुमठेकर २० गुंठे , केवनाळे २० गुंठे अशी ८ ते १० एकर क्षेत्रावर हळद लागवड सुरु असून यामुळे तालुक्यात पिवळी क्रांती होणार आहे.

“शेअर” स्वयंसेवी संस्थेच्या संचालिका निकोला मॉन्टेरो आणि प्रकल्पाधिकारी तुषार इनामदार यांच्यासह कृषी अधिकारी बाबासाहेब चव्हाण,‍जीतेेंद सोरटे यांनी शेतक-ऱ्यांना जमिनीची निवड व मशागत, बीजप्रक्रिया व लागवडीचे अंतर याबाबत प्रशिक्षण दिले तर नजीर शिकलगार, बसवराज वाघमारे, राहूल ठोंबरे आणि संदीप मोहिते यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केल्याने पोलादपूर तालुक्यात सोनेरी हळदीच्या लागवडीने पिवळया क्रांतीची बीजे रोवली गेली आहेत.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद