Friday, July 15, 2011

ऊसतोडणी मजूर बनले बागाईतदार
दारिद्रय, बेरोजगारी आणि ऊसतोडीसाठी होणा-या स्थलांतरामुळे सांगोला तालुक्यातील गौडवाडीतील दलित समाज विकासाच्या परिघाबाहेर होता परंतु पुणे येथील अफार्म व सांगोला येथील अस्तित्व संस्थेने निजामकालीन उपलब्ध वतनी जमिनीचा विकास करुन ३७ जणांना प्रगतशील बागायतदार बनविले. वेडया बाभळी व कुसळांचे साम्राज्य असणा-या या माळरानावर नंदनवन फुलले आहे. 

निजामाच्या काळात गावकीची कामे करणा-या वंचितांना वतनी जमिनी मिळाल्या होत्या. सोलापूर जिल्हयात ३० हजार एकर तर सांगोला तालुक्यात ५ हजार २२० एकर जमीन आहे. गौडवाडी गावात अशीच ८१ एकर वतनी जमीन आहे. येथील प्रत्येक दलित बांधवांच्या नावावर प्रत्येकी दीड ते दोन एकर जमीन आहे. मात्र, मार्गदर्शन व भांडवलाच्या अभावामुळे अनेक जण रोजंदारी किंवा शेतमजुरी करीत होते. स्थलांतरामुळे ऊसातोडणी मजुरांची मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जात होती.

पुणे येथील अफार्म (अक्शन फॉर अग्रिकल्चर रिन्युअल इन महाराष्ट) या संस्थेने जर्मनीच्या वो (अरबायटर ओडपर्ट) या स्वयंसेवी वित्तीय संस्थेच्या आर्थिक सहकार्याने मार्ग काढला. 'अनुसूचित जाती-जमाती सक्षमीकरण कार्यक्रम' अंतर्गत हा प्रकल्प हाती घेतला. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या गौडवाडीची निवड झाली. सुरवातीला या शेतक-यांची शेती करण्याची मानसिकता नव्हती. ग्रामीण भागातील शेती म्हणजे आतबटटयाचा व्यवहार असा त्यांचा ठाम समज होता. मात्र, या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी शेती विस्तार कार्याचा खुबीने वापर केला. २००६ मध्ये या प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्ष सुरवात झाली. लाभार्थ्यामध्ये रोज गटचर्चा घडवून आणण्यात आल्या, त्यामुळे त्यांच्या मानसिकतेतही बदल झाला.


एकूण आठ लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद असणा-या या प्रकल्पात लोकसहभाग घेण्यात आला. पडीक जमीन 'जेसीबी'व्दारे काढण्यात आली. जमिनीचे सपाटीकरण, नांगरणी करुन शेणखत टाकण्यात आले. नाडीप पध्दतीच्या सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रयोग राबविण्यात आला. त्यातून तयार झालेली हिरवळीची, तसेच गांडुळ खते जमिनीत टाकण्यात आली. उपलब्ध असणा-या आठ विहिरींची दुरुस्ती करुन वीस फुटांनी खोली वाढविण्यात आली. या विहिरीतून सामुदायिकपणे पाणी वापरण्याचे ठरले. तसेच लाभार्थ्यांनी कृषी पंचायत तयार करुन प्रकल्पांतर्गत दहा हजार व लाभार्थ्यांकडून पाच हजार या प्रमाणात निधी जमविला. या निधीतून ५० पीव्हीसी पाइप, चार इंजिन, ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर सेट, कुदळ, फावडे तसेच शेतीपयोगी साधनांनी युक्त अवजार बॅक निर्माण करण्यात आली. 

एकूण जमिनीपैकी ४४ एकरांवर खरिपात बाजरी, मटकी, हुलगा, मका तसेच रब्बीत ज्वारी, करडई, हरभ-यांचे उत्पादन घेतले जाते. पंचवीस एकरांवर भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थी डाळिंब बागायतीतून वर्षाकाठी एक ते दीड लाख रुपयांचे उत्पादन घेतो. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही प्रत्येक शेतकरी आत्मविश्वासाने शेती करतो. उन्हाळयात पाण्याची टंचाई जाणवते. मात्र, यावर शेतक-यांनी हाताशी आलेल्या डाळिंब बागांना टॅकरव्दारे पाणीपुरवठा करुन जगविले. ऊसतोडणी आणि रोजंदारी करणारे हे कामगार आता बागाईतदार बनून स्वत:च्याच शेतात राबत आहेत.

राज्यात ६ लाख १० हजार एकर महारवतनी जमिनी आहेत. त्यापैकी बहुतांश जमिनी पडीक आहेत. सांगोल्यासारख्या पाण्याचे दुर्भिक्ष असणा-या तालुक्यात अफार्म आणि अस्तित्व ने राबविलेला हा प्रकल्प राज्यातील वतनी जमिनीसाठी पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. गौडवाडी प्रमाणे राज्यभरात हा पॅटर्न राबविल्यास उर्वरित वंचिताना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे सहज शक्य होईल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद