Wednesday, July 13, 2011

अल्प भुधारक शेतकरी बनला १५ एकर शेतीचा मालक
चामोर्शी तालुक्यातील तांबाशी येथील अल्पभुधारक शेतकरी गणपती सातपुते यांने शुन्यातुन विश्व निर्माण करीत मेहनतीच्या जोरावर पडिक जमिनीवर उत्पादन घेऊन आर्थिक प्रगती साधली . भुमिहीन गणपती सातपुते आज १५ एकर शेतीचा मालक बनला आहे. 

शेती परवडत नाही असे म्हणत कित्येंकांनी शेती करणे सोडून दिले आहे. मुळचा अल्पभुधारक असलेला गणपती सुरवातीला दुस-यांच्या शेतात मजुर म्हणून राबायचा. मजुरीवर गणपतीचे कुटुंब चालत होते. मजुरीच्या जोरावर प्रगती साधली जाणार नाही हे लक्षात येताच गणपतीने दुस-यांची शेती ठेका पध्दतीने करण्यास सुरुवात केली. अथक परिश्रमातुन नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन गणपतीने उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला गणपती सातपुतेला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. इतरांची शेती ठेक्याने घ्यायची म्हणजे पदरी पैसा असावा लागतो. मात्र मजुरीच्या भरवश्यावर कुटुंबाची गाडी चालवायची की शेती करायची असा प्रश्न गणपतीला पडला. परंतु गणपतीला आपल्या मेहनीवर पुर्ण विश्वास होता. 

गणपतीने शाळेत प्रवेश केला मात्र पहिल्याच वर्गात त्याने रामराम ठोकला. वयाच्या आठव्या वर्षी जमिनदाराची चाकरी पत्करली. संयुक्त कुटुंबात खाण्याची चणचण सर्वाना मजुरी करणे आवश्यक होते. त्यामुळै गणपतीने शिक्षणाचा नाद सोडून दिला. गणपतीच्या हिश्याला वडीलोपार्जीत नाममात्र एक एकर शेती आली. 


एक एकर शेतीच्या जोरावर गणपती सातपुते यांनी कृषी विभागाच्य मदतीने फळबागाची शेती करण्याचा निर्णय घेतला. मेहनत व कृषी विभागाच्या साथीने गणपती सातपुते यांनी शेतीतून भरघोस उत्पन्न घेतले तीन वर्षातच सातपुते यांनी १० एकर शेती खरेदी केली. वैनगंगा कृष्णा ग्रामीण बॅकेच्या अर्थसाहाय्याने पिक कर्ज घेऊन शेतीसाठी सिंचनाची सोय झाल्याने सातपुते यांनी शेतीत विविध उत्पादन घेण्यास सुरुवात केली. हळुहळु प्रगतशिल शेतकरी म्हणून गणपती सातपुते तालुक्यात नावारुपास आले. कृषी विभागाच्या वतीने सातपुते यांची आदर्श शेतकरी म्हणून निवड करण्यात आली. 

२००६ मध्ये राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या हस्ते सातपुते यांचा गौरव करण्यात आला. सातपुते यांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन इतरांनी त्याच्यापासून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.

4 comments:

 1. alpbhudharak shetkari mhanje kiti hector jirayat jamin?

  ReplyDelete
 2. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,8 ते 9 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

  ReplyDelete
 3. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,8 ते 9 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

  ReplyDelete
 4. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

  ReplyDelete

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद