Wednesday, July 13, 2011

परभणीच्‍या रेशीमाचे बंध
रेशीम धाग्‍याच्‍या उत्‍पादनात राज्‍याचा वाटा पाहिजे त्‍या प्रमाणात नाही. त्‍यामुळे हा वाटा वाढविण्‍यासाठी परभणीसह मराठवाड्यातील रेशीम उद्योग आता नव्‍याने कात टाकीत आहे. परभणी जिल्‍ह्यातील शेतक-यांचा रेशीम धागा आता हायटेक सिटी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या बंगलोरनजीक रामनगरच्‍या बाजारपेठेत पोहचला आहे. विशेष म्‍हणजे येथील रेशीम धाग्‍याला प्रती क्‍विंटल ३५ हजार रुपयांचा भाव मिळाल्‍याने येथील शेतकरी रेशमाचे हे बंध जपण्‍यासाठी सरसावला आहे. 

रेशीम किटकाचे संगोपन करुन कोष तयार करणारा रेशीम उद्योग चीन आणि भारतामध्‍ये मोठ्या प्रमाणात केला जातो चीनमध्ये ८० टक्‍के तर भारतामध्‍ये १३ टक्‍के क्षेत्र रेशीम उद्योगाने व्‍यापले असून उर्वरित ७ टक्‍के क्षेत्र जपान, बांगलादेश व अन्‍य देशांमध्‍ये आहे. रेशीम कीटकाचे तुती रेशीम, टसर रेशमी, इरी, रेशमी, मुगा रेशमी हे ४ प्रकारचे रेशीम भारतामध्‍ये घेतले जातात.

मुगा रेशीमचा धागा सोनेरी असून मुगा रेशीम आसाम व परिसरात घेतल्‍या जाते. भारतात ९५ टक्‍के तुती रेशीम व ५ टक्‍के इतर रेशीमाचे उत्‍पादन केले जाते. यामध्‍ये ५० टक्‍के रेशीम उद्योग कर्नाटकात त्‍या खालोखाल आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, जम्‍मू-काश्‍मीर येथे रेशीम उद्योग क्षेत्र आहे. ३० वर्षांपासून महाराष्‍ट्रात रेशमी उद्योग चांगल्‍या प्रकारे स्‍थिरावला असून मराठवाड्यात बीड आणि जालना जिल्‍हा रेशीम उद्योगामध्‍ये आघाडीवर आहे.


गतवर्षी देशात ३ हजार २०० एकर रेशीम लागवड करण्‍यात आली होती. तर यावर्षी ९ हजार ३०० एक्‍कर क्षेत्रावर रेशीम लागवड करण्‍यात आली असून रेशीम उत्‍पादनात बारामती आघाडीवर आहे. उद्योगाची ३ टप्‍प्‍यामध्‍ये विभागणी असून प्रथम तुती लागवड, तद्नंतर रेशीम कीटक संगोपन करुन कोषापासून रेशीम धागा काढून वस्‍त्र तयार करणे ही प्रक्रिया असते.

मराठवाडयात रेशीम उद्योग उभारी घेत असून या उद्योगाच्‍या माध्‍यमातून रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध असून दर महिन्‍याला शेक-यांच्‍या हाताला रेशीम उद्योगाच्‍या माध्‍यमातून पैसा मिळत आहे. जुलैपासून मार्चपर्यंत रेशीम उद्योग करता येतो. एका एकरमध्‍ये ६ क्‍विंटल कोषाचे उत्‍पादन होते. यातून सरासरी १५ हजार रुपये क्‍विंटल या भावाने शेतक-यांना एकरी ९० हजार रुपये मिळतात. उत्‍पादन खर्च जावून शेतक-यांना एकरी ५० हजार रुपये उत्‍पादन होत आहे.

हाच भाव बेंगलोर नजीकच्‍या रामनगर येथील बाजारात जादा असल्‍याने परभणी तालुक्‍यातील धसाडी-अंगलगाव येथील शेतक-यांसह सोनपेठ तालुक्‍यातील सायखेडा येथील शेतक-यांनी उत्‍पादित केलेला रेशीम धागा या बाजारात पोहचला आहे. 

अपंग, वृध्‍द, स्‍त्रीपुरुष यांना हा उद्योग करणे सहज शक्‍य आहे. रेशीम किड्यानी खावून उरलेला तुतीचा पाला दुभत्‍या जणावरांसाठी चांगले खाद्य होऊ शकते. याशिवाय रेशीम किडीची विष्‍ठा शेतीसाठी चांगले खत म्‍हणूनही उपयोगात आणता येते. एकंदरीत मराठवाड्याचा रेशीम उद्योग कात टाकत असून शेतक-यांच्‍या हातातही यामुळे पैसा येऊ लागला आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद