Saturday, July 2, 2011

डाळिंबावरील तेल्या चे नियंत्रण कसे कराल

पानांवरील रोगाची लक्षणे - 
रोगाची प्रथम सुरवात ही पानांवर होते. त्यानंतर अनुक्रमे कोवळ्या फुटी, फुले आणि फळे यांवर रोग येतो. सुरवातीला रोगग्रस्त पानांवर लहान आकाराचे लंब गोलाकार ते आकारहीन पाणथळ - तेलकट डाग येतात. अनुकूल हवामानात हे डाग एकत्र येऊन ते 3 ते 4 मि.मी. आकाराचे होतात. नंतर हे ठिपके काळपट रंगाचे होतात. ठिपक्‍यांच्या कडेला पिवळसर वलय दिसते. यावरून हा रोग ओळखणे सोपे जाते. हळूहळू रोगग्रस्त पाने पिवळी पडून मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. फुलकळीवरील रोगांची लक्षणेसुद्धा पानांप्रमाणे असतात.

फांदीवर रोगाची लक्षणे -
पानांप्रमाणे कोवळ्या फुटींवर रोगाचे ठिपके साधारणतः फांदीच्या पेऱ्यावर, फुटीच्या बेचक्‍यात दिसून येतात. ठिपक्‍यांचे लंब गोलाकार चिट्ट्यात रूपांतर होऊन ते गर्द तपकिरी व काळपट रंगाचे आणि थोडेसे खोलगट होतात. काही वेळेस ठिपक्‍यांच्या ठिकाणी सालीस तडे जातात आणि रोगग्रस्त भागातून पुढील फांदी सुकून वाळून जाते. डाळिंब फळावर रोगाची लक्षणे : फळांवर पानांप्रमाणे पाणथळ - तेलकट डाग पडतात. हे ठिपके हळूहळू वाढत जाऊन ते एकमेकांत मिसळतात. रोगग्रस्त भाग तपकिरी ते काळसर-तेलकट होतो. फळांवर रोगग्रस्त भागात आडवे - उभे तडे जातात व फळे फुटतात. फळांवर थोडा जरी रोग आला, तरी त्यांची प्रत पूर्णपणे खराब होते आणि अशा फळांना बाजारभाव मिळत नाही.

रोगाचा प्रसार -
प्राथमिक प्रादुर्भाव : रोगग्रस्त भागातून आणलेल्या गुटीकलमांचा वापर, बागेशेजारी रोगग्रस्त फळे आणि झाडाचे रोगग्रस्त अवशेष टाकणे. बागेमध्ये अस्वच्छता असणे, त्याचबरोबर झाडांच्या दाटीमुळे हवा खेळती नसणे व सूर्यप्रकाशाचा अभाव असणे.

दुय्यम प्रादुर्भाव : रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचा बागेत दुय्यम प्रसार हा वाऱ्याबरोबर वाहून आलेली रोगग्रस्त पाने, वादळी पाऊस, औत-अवजारे, मातीचे कण, आंतरमशागत करताना प्राणी, तसेच मजुरांच्या हाताळणीमुळे, जमिनीवर वाहणारे पाणी, कीटक इ. मुळे होतो; परंतु हवेमार्फत रोगाचा प्रसार फारच कमी होतो.

अनुकूल परिस्थिती -
पावसाळी हवामानात रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढ अतिशय झपाट्याने होते. रोगाच्या वाढीसाठी साधारणतः उष्ण (30 अंश सेल्सिअस) तापमान, मध्यम ते भरपूर आर्द्रता (50 ते 90 टक्के), अधूनमधून हलका पाऊस आणि ढगाळ हवामान अशा वातावरणाची आवश्‍यकता असते, तसेच रोगकारक जिवाणू हे 50 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत जिवंत राहू शकतात. हंगामाच्या सुरवातीला नवीन बहर फुटल्यानंतर जोराचा मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव हमखास होतो आणि पुढील वाढ झपाट्याने होते.

# डाळिंबावरील तेलकट डागाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक रोगनियोजनाची शिफारस करण्यात आली आहे.
हलक्‍या व मध्यम जमिनीत डाळिंब लागवड करावी.
रोगग्रस्त भागांत शक्‍यतो हस्त बहर घ्यावा .
लागवडीसाठी रोगविरहित प्रमाणित केलेली रोपे वापरावीत.
बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. बागेत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रत्येक झाडास तीन ते चार खोडे ठेवावीत.
छाटणीसाठी व इतर अवजारे निर्जंतुक करून वापरावीत. त्यासाठी 1 लि. पाण्यात 50 ग्रॅम मोरचूद बारीक करून विरघळून घ्यावे व या द्रावणात सर्व साहित्य 10 ते 15 मि. बुडवावे. नंतरच अवजारांचा वापर करावा.

रोगग्रस्त पाने, फुले, फळे, फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात.
बागेत जमिनीवर कॉपर डस्ट 4 टक्के (20 किलो प्रति हेक्टर) धुरळणी करावी.
छाटणीनंतर खोडावर व छाटलेल्या भागावर बॅक्टीरियानाशक 50 ग्रॅम + कॅप्टन (0.5 टक्के) 500 ग्रॅम मि.लि. पाण्यात मिसळून तयार झालेल्या द्रावणाचा मुलामा द्यावा.

छाटणीनंतर लगेचच 1 टक्का बोर्डोमिश्रणाची पहिली फवारणी करावी.
दुसरी फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने बॅक्टीरियानाशक 50 ग्रॅम + कॅप्टन (0.5 टक्के) 500 ग्रॅम मि.लि. पाण्यात मिसळून या द्रावणाची करावी.

त्यानंतर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक सल्फेट (1 ग्रॅम) + मॅग्नेशिअम सल्फेट (1 ग्रॅम) + कॅल्शिअम नायट्रेट (1 ग्रॅम) + बोरॉन (1 ग्रॅम) प्रति लिटर पाण्यात मिसळून करावी.

बागेतील रोगाचे प्रमाण आणि रोग वाढीस अनुकूल हवामान असल्यास गरजेनुसार वरीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद